घरक्रीडाभारतीय क्रिकेटसंघाचा कोहिनूर : माही

भारतीय क्रिकेटसंघाचा कोहिनूर : माही

Subscribe

कॅप्टन कूल धोनीचा आज वाढदिवस...

बिहारमध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंना २००० सालच्या आसपास विचारलं गेलं होतं, ‘‘प्रत्येकाला आपल्या करिअरबद्दल काही न काही महत्वकांक्षा असते. तर तुमची क्रिकेटमधली महत्त्वाकांक्षा काय?’’ यावर बहुतेक खेळाडू निरुत्तर झाले. अर्थात २०००च्या आसपास बिहार मध्ये क्रिकेट फारच कमी म्हणजे फक्त रेल्वे आणि फार फार तर रणजीपुरतं. त्यामुळे निरुत्तर होणं साहजिकच, मात्र या खेळाडूंमधून एक आवाज आला होता त्या आवाजाने सर्वांच लक्ष वेधलं.. त्या आवाजात गंभीरपणा आणि आत्मविश्वास होता असं म्हणायला गेलं तर नक्कीच मजाक ठरली असती. त्या आवाजाने सांगितले होते, ‘‘भारतासाठी विश्वचषक खेळताना मला षटकार मारून विश्वचषक जिंकायचाय!’’ आणि तो आवाज होता दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनीचा. अशा गोष्टींची मजा फक्त सिनेमा नाटक यांच्या पटकथा लिहितानाच चांगली वाटते. पण महेंद्रसिंग धोनी जे बोलला ते त्याने ११ वर्षांनी थंड डोक्याने वानखेडेवर षटकार मारून खर करून दाखवलं. आज तो ३८ वर्ष पूर्ण करतोय त्याला शुभेच्छा…

“धोनी ऐंशी वर्षाचा झाला आणि व्हीलचेयर वर जरी असला तरी देखील तो मैदानावर हवा..” हे वाक्य आहेत ए.बी.डिव्हीलीयर्सचे. त्याला का वाटत असावे धोनी संघात व्हीलचेयर वैगेरे तर त्यामागे कारण आहे कि, धोनीचं निरीक्षण. हे निरीक्षण असं आहे कि समोरचा संघ कसा गारद होईल याबाबत शक्यता मांडणारं. आणि १० पैकी ८ वेळा याच शक्यतांनी भारताला विजय मिळवून दिलेला आहे.

- Advertisement -

२००७ च्या विश्वचषकात मानहानीकारकपणे भारतीय संघ विंडीजमधून भारतात आला, तेव्हा पोलीस संरक्षणात त्यांना घरी जावे लागले. हा प्रसंग धोनीला खूप टोचला. एका मुलाखतीत त्याने ते बोलून दाखवले कि, तेव्हा मला गुन्हेगार असल्यासारखं वाटतं होत. आणि जेव्हा आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला मानहानी सहन करावी लागते तेव्हा तो फार वाईट काळ असतो.” पण त्यांनतर धोनी शांत आणि संयमी झाल्याचे दिसून आले. २००७ चा T-20 विश्वकप असो किंवा त्यानंतर भारतीय संघाने केलेली कामगिरी असो यामध्ये कुठेही तो कमी पडल्याचे दिसत नाही. मात्र या सगळ्या सामन्यांमध्ये एक गोष्ट नक्कीच दिसली त्याचा रुथलेसनेस. शेवटच्या षटकात टप्प्यातला स्कोर करायचा असल्यास त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी कमालीची शांतता एखाद्या सिरीयल किलर सारखीच असते.

माजलेल्याचा माज उतरवणारा जर कोणी असेल तर त्याही बाबतीत धोनीचं नाव घ्यावे लागेल. ऑसी संघ शेरेबाजी करण्यात आजही क्रमांक एकला आहे. एका मुलाखतीत सांगताना खेळाडू सांगतात, “ऑसी संघाला त्यांच्याच देशात खेळलेल्या मालिकेत हरविले तो सामना. त्या सामन्यात भारत धावा चांगल्या प्रकारे करत होता. विजयाला अवघ्या काही धावा बाकी असताना धोनीने बॅट बदलण्यासाठी पॅव्हेलीयन मधून सदस्याला बोलविले आणि सामना जिंकल्यावर कोणताच जल्लोष न करण्याचे सांगितले. या निरोपामुळे सर्व भारतीय खेळाडू नाराज झाले. पण त्यामागचे कारण असे होते कि उगाच जल्लोष करून त्यंना का मोठं करायचं. इतर संघांसारखच त्यांनाही समजायचं. बस्स… याच एका कृतीमुळे ऑसी संघ सामना तर हरला पण मानसिक देखील खच्ची झाला होता.” ही धोनीची मुत्सद्देगिरी.

- Advertisement -

मात्र वाढत्या वयामुळे त्याने निवृत्त घ्यावी असे अनेक फुकटचे सल्ले त्याला दिले जातात. एखादा खेळाडू किती धावा होऊ शकतात हे अचूक सांगू शकतो तसेच खेळपट्टीवर खेळणाऱ्या फलंदाजाचे तो क्रीजवर आल्यावर पहिल्या पाच मिनिटांत त्याचे कच्चे दुवे शोधून त्याप्रकारे बोलिंग करायला लावतो आणि विकेट मिळवून देतो तो खेळाडू त्याच्या स्वतःबद्दल जागरूक नसेल काय? एक गोष्ट मान्य करायलाच हवी कि धोनीने सर्व प्रेक्षकांना एक सवय लावून दिली होती शेवटच्या पाच ओव्हर मध्ये समोर लक्ष किती पण असो तो लीलया पार करायचा ते आता त्याच्याकडून नाही होत. मात्र या ठिकाणी हे विसरून चालणार नाही कि आजही विकेटच्या मागे पापणी पडायच्या आत यष्टी उडवणारा धोनीच आहे, जणू त्याच्या हालचालीची आणि डोळ्याच्या पापणीची स्पर्धा होत असावी. कित्येक फलंदाज तर तो मागे उभा आहे म्हणून फ्रंटला येऊन खेळायचे टाळतात.

सध्या तो भारतीय संघाचा सदस्य म्हणून खेळतोय पण हे फक्त त्यालाच माहिती कारण अजूनही संपूर्ण भारतीय प्रेक्षक त्याला एक मार्गदर्शक म्हणूनच बघताय. कर्णधार म्हणून विराट कोहली फक्त आहे पण मैदानावरची रणनीती उभी करायला आजही धोनीच मदत करतोय. सध्या चालू असलेल्या विश्वचषकात धोनी कडून धावा कमी झाल्या म्हणून त्याच संघातील महत्व कमी होत नाही. कारण आजही तो १००च्या स्ट्राईक रेटने धावा जमवतोय, आणि वय झालं असं म्हणणाऱ्यांना अप्रतिम झेल घेऊन निरुत्तर देखील करतोय.

तो त्याच्या मताप्रमाणे निवृत्ती घेईल कारण त्याला त्याच्या शरीराबाबत इतरांपेक्षा चांगलच समजत असावं, पण त्याआधी संघाला क्रमांक चारचा खेळाडू आणि यष्टीरक्षक भेटत नाही तोवर तरी तो खेळ चालू ठेवेल असं वाटतं. जागतिक मंचावरून पायउतार होणं सोप नाहीये पण तो ज्या दिवशी निवृत्ती घोषित करेल त्यादिवशी त्याचे पाठीराखे त्याचे टीकाकार सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या असतील यात शंकाच नाही. फक्त या कुल खेळाडूचा अंतिम सामना देखील यादगार व्हावा ही अपेक्षा.

Video: धोनी म्हणजे अविश्वसनीय प्रतिभा, लाखो लोकांची प्रेरणा – आयसीसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -