घरक्रीडाHappy Birthday Sachin Tendulkar: सचिन- अंजलीच्या लव्ह स्टोरी ते लग्नपर्यंतची अनोखी गोष्ट

Happy Birthday Sachin Tendulkar: सचिन- अंजलीच्या लव्ह स्टोरी ते लग्नपर्यंतची अनोखी गोष्ट

Subscribe

भारतासह जगभरातील किक्रेट रसिकांच्या मनात गेली २४ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४८ वा वाढदिवस. सचिनने आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. १६ वर्षी क्रिकेट विश्वात पदापर्ण करणाऱ्या सचिनने आजपर्यंत क्रिकेटमध्ये अनेक इतिहास रचले. परंतु वयाच्या ४० व्या वर्षी त्यांने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आज भारतीय क्रिकेट विश्वात सचिनला क्रिकेटचा देव अशी उपमा दिली जाते. सचिनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सचिन तेंडुलकरच्या ‘लव्ह लाईफ’विषयी एक किस्सा आपल्यासाठी घेवून आलो आहोत.

एअरपोर्टवर सचिनला भेटली होती अंजली 

सचिनच्या मैदानातील विक्रमांची जशी नेहमीच चर्चा होते, तशीच त्याच्या लव्हस्टोरीचीही होतेच.सचिनची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सचिन आणि अंजलीची पहिली भेट १९९० च्या दशकात मुंबई विमानतळावर झाली होती. यावेळी सचिन आपल्या क्रिकेट करियरमधील पहिला इंग्लंड क्रिकेट दौऱ्यावरून येत होतो. दोघांनी फक्त एकमेकांना बघितलं होतं. दरम्यान १७ वर्षीय सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये नाबाद ११९ रन घेत इतिहास रचला भारतात येत होता. त्यावेळी पाकिस्तानी मुश्ताक मोहम्मदनंतर अगदी कमी वयात टेस्ट मॅचमध्ये शतक ठेकण्याचा इतिहास रचणार एकमेव सचिन होता.

- Advertisement -

दरम्यान मुंबई एअरपोर्टवर अंजली आपल्या मैत्रीणीसह आईला रिसीव्ह करण्यासाठी आली होती. यावेळी अंजलीची मैत्रिण डॉ. अपर्णाने सचिनला ओळखले. यावेळी तिने सचिनकडे इशारा करत अंजलीला सांगितले की, हा तोच आहे ज्याने इंग्लंडमध्ये सेंच्युरी पूर्ण केली होती. अंजलीने हे ऐकताच ऑटोग्राफ घेण्यासाठी सचिनच्या दिशेने धावली. यावेळी आपल्या मागे धावणाऱ्या अंजलीला पाहून सचिन देखील लाजराबुजरा झाला. पहिल्याच नजरेत अंजली सचिनवर भाळली होती. परंतु सचिन एअरपोर्टवर घेण्यासाठी आलेल्या भाऊ अजित आणि नितीनसह गाडीमध्ये बसून निघून गेला.

अंजलीने पत्रकार बनत गाठले सचिनचे घर

पहिल्याच नजरेत सचिनवर भाळलेल्या अंजलीने सचिनशी बोलण्यासाठी कसाबसा त्याचा फोन नंबर शोधून काढला. मित्र मैत्रिणींच्या मदतीने फोन नंबर शोधत सचिनसह बोलण्यात अंजली यशस्वी झाली. फोनवर बोलता बोलता त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघे कॉमन फ्रेडच्या घरी भेटले होते. सचिनवर भाळलेल्या अंजलीने पत्रकार बनत सचिनते घरी गाठले. तेव्‍हा सचिनच्‍या आईने तिला ‘तू खरोखर पत्रकार आहेस का? असा प्रश्‍न केला होता. तेव्‍हा अंजलीची भंबेरीही उडाली होती. याशिवाय अंजलीने सचिनला ‘चॉकलेट’ गिफ्ट केल्यानंतर आईच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. पण तिने फक्त स्मित हास्य करून अंजलीला सून म्हणून स्वीकारले होते, असा खुलासा एकदा खुद्द सचिनने केला होता.

- Advertisement -

याच दरम्यान सचिननची क्रिकेटमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे शहरात खुलेआम दोघांना भेटणे सुरक्षित वाढत नव्हते. त्यामुळे अंजलीला भेटण्यासाठी सचिन ग्रांट मेडिकल कॉलेज- जेजे हॉस्पीटलमध्ये जायचा. यावेळी अंजली डॉक्टर पदवीचे प्रशिक्षण घेत होती. अनेकदा अंजलीच्या लोणावळ्यातील बंगल्यावरही दोघे एकमेकांसह टाईम स्पेंड करायचे. दोघंही पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. लव्ह स्टोरीदरम्यानच्या गमती सांगताना एका इंटव्ह्यूमध्ये सचिनने म्हणाला होती की, आम्ही दोघे काही मित्र मैत्रिणींसह ‘रोजा’ सिनेमा पाहयला गेलो होतो. यावेळी ओळख लपवण्यासाठी सचिनने सरदारसारखे कपडे परिधान करत नकली दाढी लावत थिएटर गाठले. परंतु असेही करुनही सचिनची ओळख लपवता आली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याला ओळखले. त्यामुळे त्यांना चित्रपट अर्थवट सोडून निघावे लागले होते.

प्रेमाचा लग्नापर्यंतचा प्रवास

सचिन थोडा लाजऱ्या स्वभावाचा होता. त्यामुळे आपल्या घरातल्यांना अंजलीसोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल त्याला सांगणे कठीण जात होते. परंतु अंजलीने पुढाकार घेत लग्नाची बोलणी केली. यावेळी अंजलीला सचिन म्हणाला होता, अंजलीसह लग्नाची गोष्ट घरी सांगणे म्हणजे जगातील सर्वात फास्ट गोलंदाजाशी सामना करण्यापेक्षाही कठीण आहे. दरम्यान दोघांच्या घरचा होकार मिळाल्यानंतर दोघांनी १९९४ साली न्युझीलँडमध्ये साखरपुडा केला. यावेळी सचिन भारतीय क्रिकेट टीमसह न्युझीलँड दौऱ्यावर होता. यावेळी २४ एप्रिल १९९५ रोजी सचिनने २१ व्या वाढदिवसा दिवशी अंजलीसह साखरपुडा केला. आणि २४ मे १९९५ मध्ये दोघांनी लग्न केलं. क्रिकेटचा महानायक, मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडुलकरलाही पहिल्‍याच नजरेत प्रेम जडले होते. भलेही अंजली सचिनपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. परंतु सचिन आणि अंजलीची प्रेम कहाणी साऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -