घरक्रीडाभज्जी आणि गीताच्या मुलाच्या नावाची जोरदार चर्चा

भज्जी आणि गीताच्या मुलाच्या नावाची जोरदार चर्चा

Subscribe

मुलाचे नाव ऐकून दोघांचे चाहते अवाक झाल्याचे पहायला मिळाले

भारतीय क्रिकेटर हरभजन सिंहची (Harbhajan singh) पत्नी गीता बसरा (Geeta basara )हिने एका बाळाला जन्म दिला. हरभजन आणि गीता दुसऱ्यांदा आई वडील झालेत. भज्जी आणि गीता यांना पहिली मुलगी आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर भज्जी आणि गीता यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. दोघेही आपल्या मुलाचे नाव काय ठेवणार याविषयी अनेक वेळा त्यांना विचारणा झाली होती. चाहते मुलाचे नाव ऐकण्यासाठी उत्साही होते. त्यातच गीता बसरा हिने तिच्या सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करत त्याच्या नावाची घोषणा केली. मुलाचे नाव ऐकून दोघांचे चाहते अवाक झाल्याचे पहायला मिळाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

- Advertisement -

गीताने आपल्या मोठ्या मुलीसोबत लहान मुलाचा फोटो शेअर करत मुलाचे नाव सांगितले. भज्जी आणि गीताने त्यांच्या मुलाचे नाव ‘जोवान’ असे ठेवले आहे. ‘इंट्रोड्यूसिंग हीर का वीर – जोवान वीर सिंह प्लाहा’, असे म्हणत गीताने मुलाच्या नावाची घोषणा केली. तिच्या पोस्टनंतर ‘जोवान’ या नावाचा अर्थ काय अशा अनेक कमेंट आल्या. जोवान हे नाव अतिशय वेगळे ठरत असल्याने भज्जी आणि गीता यांच्या मुलाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा भज्जी आणि गीता यांच्या मुलाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

- Advertisement -

जोवान नावाचा अर्थ काय?

जोवान नावाचा अर्थ देवाने दिलेली सुंदर भेट असा होतो. त्याचप्रमाणे जोवान नावाचा अर्थ दयाळू,उदार आणि दयावान असाही होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील त्यांच्या मुलीचे ‘वामिका’ असे ठेवले. वामिका नाव देखील इतर नावांपेक्षा वेगळे ठरले. वामिका या नावाची देखील सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. वामिका हे देवीचे नाव असल्याचे विरुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते.


हेही वाचा – Bishan Singh Bedi 75 : बिशन सिंह बेदी पंच्याहत्तरीत, अभिनव बिंद्राचे भावनिक पत्र

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -