घरक्रीडाIND VS NZ : KKR कडून १६०० धावा केल्या, पण निवड समितीने...

IND VS NZ : KKR कडून १६०० धावा केल्या, पण निवड समितीने नाकारले; हरभजन सिंगचा संताप

Subscribe

नव्या संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या खेळाडूंकडे निवड समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने बीसीसीआयला विचारला आहे

भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे (BCCI) एक दिवसापूर्वीच न्यूझीलंडविरूध्द होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या नव्या संघाची घोषणा केली आहे. सोबतच भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरूध्द होणाऱ्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा झाली आहे. दोन्ही नव्या संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या खेळाडूंकडे निवड समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने बीसीसीआयला विचारला आहे. सौराष्ट्रचा फलंदाज शेल्डन जॅक्सनची (sheldon jackson) भारतीय संघात निवड न झाल्याने हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे.

हरभजन सिंगने ट्विटमध्ये म्हटले की, “२०१८-१९ च्या रणजी ट्रॉफीमध्ये ८५४ आणि २०१९-२० च्या हंगामात ८०९ धावा करून शेल्डन जॅक्सनने संघाला चॅम्पियन बनवले. तो या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तरीदेखील भारताच्या ‘अ’ संघात देखील त्याची निवड झाली नाही. जॅक्सनने अजून काय केले जे ते निवड समिती त्याला सांगले का? असा संतप्त प्रश्न हरभजन सिंगने ट्विटच्या माध्यमातून विचारला.

- Advertisement -

जॅक्सनच्या निवडीत वयाचा अडथळा

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी निवड समितीने भविष्याचा विचार करताना युवा खेळाडूंना संधी दिली आहे. जॅक्सनचे वय सध्या ३५ वर्ष आहे. त्यामुळे जॅक्सनचे वय हा त्याच्या निवडीबाबतचा मोठा अडथळा ठरला आहे. त्याचे वय जरी जास्त असले तरी त्याचे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता निवड समितीवर आक्षेप घेणे स्वाभाविक आहे. अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही शेल्डन जॅक्सन चांगली खेळी करत आहे. त्याने मागील काही सामन्यांमध्ये ६२, ७० आणि ७९ धावांची खेळी केली आहे तर २ वेळा नाबाद परतला आहे आणि याचा उल्लेख देखील हरभजनने ट्विटमध्ये केला आहे. जॅक्सनने ६० लिस्ट ए सामन्यांमध्ये २०९६ धावा केल्या आहेत. तर ६४ टी-२० सामन्यांत १४६१ धावा केल्या आहेत.


हे ही वाचा: Padma Awards 2020: मूर्ती लहान पण कीर्ती महान; पद्म श्री पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती मंचावरून उतरले


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -