Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाHarbhajan Singh : वाह, इंग्रजांची औलाद..., एक्सवर हरभजन सिंग अन् प्रेक्षकामध्ये वाद; नेमकं काय घडलं?

Harbhajan Singh : वाह, इंग्रजांची औलाद…, एक्सवर हरभजन सिंग अन् प्रेक्षकामध्ये वाद; नेमकं काय घडलं?

Subscribe

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंग भारताच्या प्रत्येक सामन्यात समालोचन करताना दिसतो. समालोचनावेळी हरभजन अनेक कमेंट्स करतो, त्यावरून नेहमीच तो चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. मात्र, सध्या हरभजन एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंग भारताच्या प्रत्येक सामन्यात समालोचन करताना दिसतो. समालोचनावेळी हरभजन अनेक कमेंट्स करतो, त्यावरून नेहमीच तो चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. मात्र, सध्या हरभजन एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर हरभजन सिंग आणि एका प्रेक्षकामध्ये वाद रंगला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यानंतर हरभजन सिंगने सोशल मीडियावर एका युजरच्या पोस्टवर रिप्लाय दिला होता. (harbhajan singh fights with x user over refusing to say khalistan murdabad and hindi commentary)

हरभजन आणि प्रेक्षक याच्यातील सोशल मीडियावरील वाद काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने ‘भारताचा विजयाचा आनंद…’, असे सोशल मीडियावर लिहिले होते. यावर एका चाहत्याने हिंदी कॉमेंट्रीवर निशाणा साधला होता. रँडम सेना नावाच्या अकाऊंटवरून एक्सवर हरभजनसिंगला रिप्लाय दिला जात होता.

हरभजन सिंग : भारताचा विजयाचा आनंद…

प्रेक्षक : हिंदी कॉमेंट्री या सुंदर ग्रहावरील सर्वात वाईट गोष्टींपैकी एक असू शकते.

हरभजन सिंग : वाह, इंग्रजांची औलाद… तुझी मला किव येते. आपली भाषा बोलण्याचा आणि ऐकण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

प्रेक्षक : हे हिंदीत का नाही लिहिलं? बरं, अभिमान नाही गर्व असला पाहिजे.

हरभजन सिंग : तू वेडा तर नाही वाटत पण तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे. हे बरोबर लिहलंय का?

प्रेक्षक : हे आहे शुद्ध हिंदी, आता तू इतरांना बोलू शकतोस. ‘ये हुए शुद्ध हिंदी असं लिहिलं होतं.

हरभजन सिंग : ये हुए नाही हुई असत. मी तुझ्या उपचारासाठी आणि तू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो.

दरम्यान, सोशल मीडियावर या वादानंतर युजरने इंझमाम उल हकचा व्हिडिओ शेअर केल्याने हा वाद आणखी चिघळला. ज्यामध्ये इंझमाम सांगत होता, खेळताना आम्ही एक खोली बनवली होती, ज्यामध्ये आम्ही नमाज अदा करायचो. १-२ दिवसांनी भारतातून मुस्लिम क्रिकेटपटूही तिथे येऊ लागले आणि काही भारतीय खेळाडूही. मौलाना नमाजनंतर आमच्याशी बोलत असे. एके दिवशी हरभजनने मला सांगितले की, मला वाटते की मी त्यांचं म्हणणं ऐकू. यावर मी म्हणालो तू करू शकतोस आणि मग हरभजन म्हणाला, मी तुला पाहून थांबतो.

या व्हिडीओवर हरभजन सिंग याने प्रत्युत्तर दिले आहे. “हो यांनाही मानसिक उपचारासाठी तुमच्यासोबत रुग्णालयात घेऊन जा. तुमच्याप्रमाणेच त्यांनाही इलाज करण्याची गरज आहे”, असे हरभजन सिंग म्हणाला.

त्यानंतर हरभजन याने त्या यूजरची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने अयोध्येतील हिंदूंवर वादग्रस्त कमेंट केली होती. तसेच, “तू नक्की कोणत्या बाजूचा आहेस? आमच्या अयोध्येतील हिंदू बांधवांना कोण चुकीचे बोलत आहे. तुझ्या मानसिक स्थितीपेक्षा तू देशद्रोही असण्याचा मला जास्त संशय आहे”, असे म्हणत त्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.


हेही वाचा – Gill Vs. Abrar : गिलला चकवा देणाऱ्या अबरारचे ते हावभाव…, वासिम अक्रमकडून कानपिचक्या