घरक्रीडाक्रिकेटर्सचा लेडीज वर्जन कोलाज; खेळाडूंची भन्नाट प्रतिक्रिया

क्रिकेटर्सचा लेडीज वर्जन कोलाज; खेळाडूंची भन्नाट प्रतिक्रिया

Subscribe

सध्या सोशल मीडियावर फोटो कोलाजचा ट्रेंड सुरू आहे. नुकताच अभिनेत्रींच्या मेल वर्जनचा कोलाज व्हायरल झाला असून आता क्रिकेटर्सच्या लेडीज वर्जनचा कोलाज पाहायला मिळत आहे. हरभजन सिंह याने त्याच्या इंस्टाग्रामवर हा फोटो कोलाज शेअर केला असून यावर सहखेळाडूंच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. माजी क्रिकेटर सौरभ गांगुली याने तर मला मधली चष्मेवाली मुलगी पसंत पडली असल्याची कमेंट दिली आहे. या कोलाजसोबत हरभजनने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. त्याने विचारले आहे की, कोणासोबत डेटवर जाण्यास पसंती द्याल. त्यावर सौरभ गांगुलीने हे उत्तर दिले. या कोलाजमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंह, हरभजन सिंह, सौरभ गांगुली यांचे लेडीद वर्जन दिसत आहेत.

- Advertisement -

सौरभ गांगुलीने स्वतःच्याच फोटोला पसंती दर्शवत मधोमध असलेल्या चष्मावाल्या मुलीसोबत डेटवर जायला आवडेल असे कमेंटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा –

चीनमध्ये वटवाघुळानंतर आता कुत्र्याच्या मांस विक्रीचा बाजार सुरू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -