घरक्रीडाहार्दिक-नताशा पुन्हा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

हार्दिक-नताशा पुन्हा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

Subscribe

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा नताशा स्टेनकोविक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने काल दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची अनेकजण नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. मंगळवारी जगभरातील लोक ‘व्हेलनटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला. याचं निमित्ताने भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा नताशा स्टेनकोविक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने काल दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. दरम्यान, सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हार्दिक-नताशाने शेअर केले फोटो

हार्दिक-नताशाने 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलनटाईन डे’च्या निमित्ताने काल पुन्हा लग्न केले. याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात केले असून ते सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोखाली हार्दिकने लिहिलंय की, “आम्ही तीन वर्ष आधी घेतलेली शपथेची पुनरावृत्ती करुन व्हेलनटाईन डे साजरा करत आहोत. आमचे प्रेम साजरे करण्यासाठी आमचे कुटुंबीय आणि मित्र आमच्या आजूबाजूला असल्याने आम्ही खरोखरच धन्य आहोत.” या फोटोंमध्ये नताशाने व्हाईट गाऊन परिधान केला होता तर हार्दिक पंड्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता.

- Advertisement -

हार्दिक-नताशा 2020 पासून एकत्र

हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी नताशाला क्रूझवर प्रपोज केले होते. त्यावेळीच दोघांनी एंगेजमेंट देखील केली. त्यानंतर जुलै 2020 मध्ये हार्दिक आणि नताशाचे घाईगडबडीत लग्न झाले होते. कदाचित त्यावेळी नताशा गरोदर होती. त्यामुळे त्यांना पहिले लग्न धूमधडाक्यात करता आले नव्हते.

 

- Advertisement -

हेही वाचा : 

बहुचर्चित ‘वेडात वीर दौडले सात’ मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची लागली वर्णी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -