हार्दिक पांड्या, ऋषभ पंत अखेरच्या षटकांमध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकरांचे मत

आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी यंदाच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हे युवा खेळाडू कशी कामगिरी करणार आणि भारतीय संघातील आपले स्थान टिकवणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी यंदाच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हे युवा खेळाडू कशी कामगिरी करणार आणि भारतीय संघातील आपले स्थान टिकवणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक अनुभवी खेळाडूंबाबतही भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी चर्चा आणि आपली मत मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gawaskar) यांनी ‘अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) हे दोघे अखेरच्या पाच षटकात प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकतात’, असे मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – “तू आता कर्णधार नाहीस त्यामुळे…”;हार्दिक पांड्याला विराटच्या प्रशिक्षकांकडून इशारा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, “हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत हे दोन असे खेळाडू आहेत जे ५-६ क्रमांकावर फलंदाजी शकतात आणि १०० ते १२० धावा करू शकतात. यंदाच्या आयपीएलच्या १५व्या पर्वात सर्व क्रिकेटप्रेमींची नजर हार्दिक पांड्यावर होती. मागील अधिक महिन्यांपासून हार्दिक भारतीय संघात परत येण्याचा प्रयत्न करत होता. टी-२० विश्वचषक २०२१ मधील पराभवानंतर हार्दिक टीम इंडियाकडून खेळला नव्हता. आयपीएल २०२२मध्ये तो मैदानावर परतला. हार्दिकने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह फिटनेस आणि नेतृत्व गुणदेखील दाखवला. गुजरातकडून हार्दिकने चौथ्या क्रमांकावर एक वेगळीच भूमिका पार पाडली. गोलंदाजीत काही सामन्यात त्याने मोहम्मद शमीसोबत सुरुवात केली. अर्थात आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते”, असे सुनील गावस्कर यांनी म्हटले.

“ऋषभ पंतसाठी आयपीएलचा हंगाम फार चांगला ठरला नाही. आता पुढील मालिकेत तो मोठी धावसंख्या करण्यास उत्सुक असेल”, असे सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतबाबत आपले मत व्यक्त केले.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने साखळी सामन्यात उत्तम कामगिरी करत अंतिम सामना जिंकला. गुजरात टायटन्सने आयपीएल पदार्पणात विजेतेपद मिळवले. दरम्यान, भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.


हेही वाचा – राफेल नदाल फ्रेंच ओपनचा अंतिम फेरीत प्रवेश, प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह जखमी