Video: ‘हार्दिक’ शुभेच्छा पांड्या, सर्बियन मॉडेलसोबत दुबईत उरकला साखरपुडा

Hardik pandya engagment in dubai with natasha
हार्दिक पांड्या आणि त्याची होणारी पत्नी नताशा

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने सर्बियाई अभिनेत्री नताशा स्टेनकोविक सोबत साखरपुडा केला आहे. हार्दिकने काही वेळापुर्वीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन आपल्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. “मै तेरा, तु मेरी, जाने सारा हिंदुस्तान” अशी कॅप्शन लिहत पांड्याने आपल्या साखरपुड्याची बातमी दिली आहे.

हार्दिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशा आपल्या हातातील अंगठी दाखवताना दिसत आहे. हा फोटो अपलोड केल्यानंतर या पोस्टखाली हार्दिकच्या चाहत्यांनी त्याला हार्दिक शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. काल ३१ डिसेंबर रोजी हार्दिकने नताशासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन नव्या वर्षाची सुरुवात माझ्या जोडीदारासोबत करत असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आज त्याने दुबईत अनोख्या अंदाजात आपला साखरपुडा केला आहे.

हार्दिक पांड्याचा साखरपुडा

हार्दिक 'अभिनंदन' पांड्या; पाहा साखरपुड्याचा व्हिडिओ

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜನವರಿ 1, 2020

 

 

View this post on Instagram

Starting the year with my firework ❣️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशाच्या रिलेशनशिपबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या. त्यातच हार्दिकने नताशाची आपल्या घरच्यांशी ओळख करुन दिल्यामुळे अफवा खऱ्या ठरल्या असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर नताशाने देखील हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टा पोस्ट करुन या नात्याला एकप्रकारे दुजोरा दिला होता.

दुखापतीमुळे हार्दिक सध्या भारतीय संघात खेळत नाही आहे. पांड्याने सप्टेंबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत शेवटचा सामना खेळला होता. ऑक्टोबरपासून त्याच्या पाठीची सर्जरी झाल्यापासून तो क्रिकेटपासून लांब आहे.