घरक्रीडाज्युनियर पांड्याचं ठरलं नाव

ज्युनियर पांड्याचं ठरलं नाव

Subscribe

केकवरून ज्युनियर पांड्याच्या नावाचा खुलासा झाला आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ३० जुलै रोजी बाबा झाल्याची गोड बातमी दिली. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच या जोडप्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. ही गोड बातमी कळताच क्रिडा क्षेत्रातील अनेकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. हार्दिक-नताशाने बुधवारी डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत केक कापला. यानंतर दोघे जण बाळाला घेऊन घरी परतले. पण यानिमित्ताने कुणाल पांड्या आणि त्याच्या पत्नीने छोट्या पाहूण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील केकवरून ज्युनियर पांड्याच्या नावाचा खुलासा झाला आहे.

- Advertisement -

या केकवर नतासा आणि अगस्त्या असे लिहिले होते. त्यामुळे ज्युनियर पांड्याचे नाव अगस्त असल्याचा सध्या अंदाज लावला जात आहे. मात्र अद्याप ज्युनियर पांड्याच्या नावाबाबत हार्दिक-नताशाचे अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. पण केक कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे ज्युनियर पांड्याचे नाव काय असले हे सगळ्यांना समजले आहे.

- Advertisement -

२०२० वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकने बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले. हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीने साखरपुडा केला. दरम्यान, गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून लग्नही उरकून घेतले. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट नताशाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्याने फुलांचा गुच्छा भेट दिला होता.


हेही वाचा – राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून हसीन जहांला आली बलात्काराची धमकी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -