T20 record : शेवटच्या ओव्हरचा षटकारांचा विक्रम मोडीत, पंड्याने जडेजा, रोहितला टाकले मागे

hardik pandyaa

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ च्या २४ व्या सामन्यात आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत एक चांगली खेळी केली. टीमचा स्कोअर २० ओव्हरमध्ये ४ विकेट्सवर १९२ धावांवर नेण्यात हार्दिकचा महत्वाचा वाटा होता. हार्दिक पटेलने ५२ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या. आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये ही दुसरी मोठी खेळी पंड्याने केली आहे. याआधी राजस्थान रॉयल्सविरोधात हार्दिक पंड्याने मोठी खेळी केली होती. हार्दिकने यंदाच्या मौसमातील सामन्यात नाबाद ८७ धावा केल्या. त्यामध्ये ४ चौकारांचाही समावेश आहे. तर २० व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या बाबतीत हार्दिक तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची किमया हार्दिक पंड्याने केली आहे.

जडेजा आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडीत 

हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सविरोधात शेवटच्या ओव्हरमध्ये एक षटकार लावला. आयपीएलच्या करिअरमध्ये हार्दिक पंड्याचा हा २४ वा षटकार आहे. आयपीएल सामन्यात २० व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार लावण्याच्या बाबतीत पंड्या आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. धोनी आणि पोलार्डनंतर आता हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर रवींद्र जडेजा आणि रोहित शर्माला त्याने पिछाडीवर टाकले आहे. आयपीएलमध्ये २० व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार लावण्याचा विक्रम हा धोनीच्या नावावर आहे. धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक असे ५० षटकार लगावले आहेत. तर ३३ षटकारांसह किरॉन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम
१) एम एस धोनी ५० षटकार
२) किरोन पोलार्ड – ३३ षटकार
३) हार्दिक पंड्या – २४ षटकार
४) रवींद्र जडेजा – २३ षटकार
५) रोहित शर्मा – २३ षटकार