Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला, म्हणाला...

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला, म्हणाला…

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या दिलेले 160 धावांचे आवाहन पूर्ण केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या दिलेले 160 धावांचे आवाहन पूर्ण केले. मात्र या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या विजयानंतर हार्दिक पांड्याला त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली. या आठवणीत मुलाखत देताना तो ढसाढसा रडला. (Hardik Pandya got emotional during the interview IND vs PAK)

हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच ढसाढसा रडला. यावेळी रडताना हार्दिकने त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आणि केलेल्या बलिदानाची आठवण केली. त्याच्यासाठी ते एका शहरातून दुसरीकडे गेले. तो स्वत:ही एक बाप आहे मुलावर खूप प्रेम करतो पण घरातल्यांनी केलेले बलिदान खूप मोठे होते असे पांड्या म्हणाला.

- Advertisement -

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करताना 160 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. पाकिस्तानने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताकडून फलंदाजी करताना रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.


- Advertisement -

हेही वाचा – अटीतटीच्या लढतीत भारताचा 4 विकेट्सनी पाकिस्तानवर विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -