घरIPL 2020अर्धशतक केल्यानंतर पांड्याने मैदानात गुडघा टेकला आणि जगभरातून कौतुक झालं

अर्धशतक केल्यानंतर पांड्याने मैदानात गुडघा टेकला आणि जगभरातून कौतुक झालं

Subscribe

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या तडाखेबाज षटकारांसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. तसेच त्याचे वक्तव्य किंवा कृती देखील प्रसिद्धीच्या किंवा टीकेच्या झोतात येत असते. दसऱ्याच्या दिवशी राजस्थान रॉयल्ससोबत झालेल्या सामन्यात पांड्याने २१ चेंडूत वादळी खेळी करत ६० धावा काढल्या होत्या. याच सामन्यात अर्धशतक पुर्ण झाल्यानंतर पांड्या एक गुडघा जमिनीवर टेकवत उजव्या हाताने अभिवादन करताना दिसला. या कृतीचा अर्थ अनेकांना सामना सुरु असताना कळला नाही. मात्र त्यानंतर हा फोटो ट्विट करत पांड्याने या कृतीचा अर्थ सांगितला आहे. #BlackLivesMatter या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी पांड्याने ही कृती केली होती.

काय आहे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळ?

यावर्षी अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लाईडची पोलिसांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या कृतीच्या विरोधात जगभरात ब्लॅक लाईव्हज मॅटर ही चळवळ सुरु झाली. जॉर्जच्या मृत्यूनंतर अनेक स्पोर्ट्स सेलिब्रिटींनी या चळवळीला पाठिंबा देत आपल्यासोबतही वर्णभेदी कृत्य झाल्याचा प्रसंग सांगितला.

- Advertisement -

हार्दिक पांड्याने या चळवळीला पाठिंबा देण्याआधी विडिंजचा क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरने आयपीएलमधील खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेने या चळवळीकडे दुर्लक्ष केले असल्याचे होल्डर याने सांगितले होते. होल्डरने याचवर्षी झालेल्या इंग्लंड आणि विंडिजच्या टेस्ट सामन्यादरम्यान या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी एक गुडघा जमिनीवर वाकवून बसण्याची पद्धतीची सुरुवात केली होती. त्याचाही फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

- Advertisement -
England west indies test match
जेसन होल्डरने या चळवळीला क्रिकेटच्या मैदानात आणले.

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये या चळवळीला पाठिंबा देणार हार्दिक पांड्या हा पहिला खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या विरोधातला सामना मुंबईने ८ विकेट्सने गमावला असला तरी पांड्याचे खेळीने सर्वांचेच मनोरंजन केले होते. २१ चेंडूत धुवाँधार फलंदाजी करत ३०० स्ट्राईक रेटने पांड्याने धावा लुटल्या. त्यानंतर त्याने ब्लॅक लाईव्हज मॅटरला पाठिंबा दिल्यानंतर सीमारेषेबाहेर बसलेल्या कायरन पोलार्डनेही आपला उजवा हाताची मुठ आवळत हात वर दाखवून पांड्याला समर्थन दिले.

hardik pandaya kireon pollard

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -