घरक्रीडाIPL 2022 : भारतीय संघातून बाहेर होताच या खेळाडूच्या अडचणीत वाढ; IPL...

IPL 2022 : भारतीय संघातून बाहेर होताच या खेळाडूच्या अडचणीत वाढ; IPL मध्ये मिळत होते ११ कोटी, आता आहे आणखी पैशांच्या शोधात

Subscribe

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या पाठीच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या पाठीच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. मात्र हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी तयार नाही आणि असे असतानाही त्याला टी-२० विश्वचषकात संधी देण्यात आली होती. पांड्याच्या दुखापतीमुळे त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेत घसरण झाली आणि त्यामुळे भारतीय संघाचे देखील नुकसान झाले. हार्दिक पांड्या टी-२० विश्वचषकातून बाहेर होताच त्याला फिटनेसवर काम करण्यास सांगितले होते. दरम्यान आता हार्दिक पांड्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पांड्या फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही खेळू शकणार नाही.

दरम्यान, हार्दिक पांड्या जानेवारीपासून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या गोलंदाजीच्या फिटनेसवर काम करणार आहे. त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेत बदल झाल्याशिवाय त्याचे क्रिकेटमधील पुनरागमन अशक्य आहे. भारतीय संघाची वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका फेब्रुवारीमध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला संघात पुनरागमन करणे अशक्य आहे. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात हार्दिक पांड्याला खराब गोलंदाजी आणि फिटनेस बद्दलच्या अडचणीमुळे नुकसान देखील होऊ शकते.

- Advertisement -

आयपीएल लिलावात खराब गोलंदाजीच्या फिटनेसचा फटका हार्दिक पांड्याला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेगा लिलावापूर्वी पांड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने रिलीज केले आहे. माहितीनुसार, अहमदाबाद आणि लखनऊ या फ्रँचायझी हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण दोन्हीही संघ त्याला मोठी किंमत देण्यास तयार नाहीत.

हार्दिक पांड्याचा २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश झाला होता, त्यावेळी पांड्याचे मानधन फक्त १० लाख एवढे होता. मात्र त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला अवघ्या ३ वर्षातच ११ कोटी वार्षिक पगार मिळाला होता. पांड्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी एकूण१४७६ धावा केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या धावा १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने केल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा:  http://PV Sindhu : सिंधूकडे मोठी जबाबदारी; बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनची बनली सदस्य


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -