घरक्रीडाहार्दिकची धोनीला वाढदिवसाची 'खास' भेट

हार्दिकची धोनीला वाढदिवसाची ‘खास’ भेट

Subscribe

हार्दिक पांड्यानं माही अर्थात महेंद्रसिंगला त्याच्या वाढदिवसाबद्दल खास भेट दिली आहे. त्याबद्दल त्यानं एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

धोनीचे जगभरातच नाही तर टीम इंडियामध्येदेखील चाहते आहेत. धोनीचा शनिवारी ३७ वा वाढदिवस संपूर्ण भारतीय टीमनं साजरा केला. त्याचे खूप फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अगदी भारताचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या इन्स्टावरून धोनीच्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट केले आहेत. केक कापत धमाल – मस्ती करत टीम इंडियानं धोनीचा वाढदिवस साजरा केला. मात्र टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या या मेंटर असलेल्या धोनीला वाढदिवसाची ‘खास’ भेट दिली आहे. आपल्या इन्स्टावर एक फोटो पोस्ट करत धोनीला त्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

काय आहे हार्दिकचं गिफ्ट

आपल्या अधिकृत इन्स्टावरून धोनीचे केस कापत असल्याचा फोटो हार्दिकनं पोस्ट केला आहे. ‘खास दिवशी खास हेअरकट. माहीला माझ्याकडून बर्थडे गिफ्ट. हा स्ंटट विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून याची कॉपी कोणीही करू नये.’ असं मजेदार कॅप्शन हार्दिकनं दिलं आहे.

- Advertisement -

माहीचे वेगवेगळे हेअरकट

क्रिकेटच्या मैदानावर महेंद्र सिंग धोनीचे वेगवेगळे हेअरकट आतापर्यंत चाहत्यांनी पाहिले आहेत. कधी लांब केस, तर कधी लहान केस. २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीचे कधीही मोठे केस पाहण्यात आले नाहीत. मात्र त्यानंतरही धोनीनं विविध स्टाईल बदलल्या आहेत. आपल्या हेअरस्टाईलसाठी नेहमीच धोनी चर्चेत राहिला आहे. २००४ मध्ये धोनी आपल्या बॅटिंगच्या फिनिशिंगबरोबरच आपल्या मोठ्या केसांसाठीदेखील प्रसिद्ध होता. तर, या केसांना कधीही कापू नकोस असा सल्ला पाकिस्तानच्या दौऱ्यात पाकिस्तानी राष्ट्रपती परवझे मुशर्रफ यांनी दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -