PAK vs BAN : पाकच्या गोलंदाजानेच मोडला शोएब अख्तरचा विश्वविक्रम

हसन अलीने बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात टाकलेल्या एका चेंडूने शोएब अख्तरचा विक्रम मोडीत काढला

टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत मॅथ्यू वेडचा झेल सोडल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा शत्रू झालेल्या हसन अलीने सध्या सुरू असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या टी-२० मालिकेत शानदार गोलंदाजी करून एका नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. हसन अलीने बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ३ बळी घेऊन पाकिस्तानच्या विजयात मोठा हातभार लावला होता. दरम्यान त्याला शानदार गोलंदाजीमुळे सामनावीर म्हणून देखील घोषित करण्यात आले होते. हसनने त्याच्या गोलंदाजीच्या दरम्यान असा एक चेंडू टाकला की त्याची विश्वविक्रमात नोंद झाली. हसन अलीच्या चेंडूचा वेग एवढा होता की त्यामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा विश्वविक्रम मोडीत काढल्याचे म्हटले जात आहे.

बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात हसन अलीने त्याच्या गोलंदाजीच्या दरम्यान एक चेंडू २१९ किमी प्रति ताशी वेगाने टाकला. दुसऱ्या षटकात टाकलेल्या या ११९ प्रति ताशी वेगाच्या चेंडूची व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक पातळीवर सर्वात वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे त्याने इंग्लंडविरूध्दच्या एका सामन्यात १६१.३ किमी प्रति ताशी वेगाने चेंडू टाकला होता. मात्र हसन अलीचा हा चेंडू शोएब अख्तरपासून जवळपास ६० किमी प्रति ताशी वेगाने जास्त होता.

शोएब अख्तरचा विश्वविक्रम हसन अलीने मोडला ?

हसन अलीच्या या चेंडूनंतर पाकिस्तानी चाहत्यांना वाटू लागले की त्याने अख्तरचा विक्रम मोडीत काढला. मात्र असे झाले नाही. स्पीड मीटर खराब झाल्यामुळे हसन अलीचा चेंडू २१९ प्रति ताशी वेगाने दिसला असे पंचाकडून सांगण्यात आले. हसन अलीने शोएब अख्तरचा विक्रम तर नाही मोडला पण सामन्यात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. हसनने पहिल्या टी-२० सामन्यात ४ षटकांत केवल २२ धावा देत ३ बळी पटकावले.


हे ही वाचा: IND vs NZ : न्यूझीलंडच्या या खेळाडूने कोहलीचा विक्रम काढला मोडीत; टी-२० मध्ये केल्या सर्वाधिक ३२४८ धावा