घरक्रीडाHBD Sir Jadeja : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू Ravindra Jadeja बद्दलच्या न...

HBD Sir Jadeja : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू Ravindra Jadeja बद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

Subscribe

भारतीय संघाच्या ‘रवींद्र जडेजा’ या अष्टपैलू खेळाडूचा जन्म ६ डिसेंबर १९८८ मध्ये गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील नवगाम खेडमध्ये झाला.रवींद्र जडेजाचा हा ३३ वा वाढदिवस असून, यानिमित्ताने त्याला क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. हॅपी बर्थ डे ‘सर जडेजा’ असा ट्रेंड सोशल मिडियावर सुरु आहे. जडेजा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करतो.टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अशी जडेजाची ओळख आहे.

रंवीद्र जडेजाचे वडील अनिवृध्दसिंह जडेजा हे एका खासगी सुरक्षा एजन्सीचे वॉचमन होते. जडेजाने आर्मी ऑफीसर व्हावे अशी त्यांच्या वडीलांची इच्छा होती. मात्र त्याला सर्वात जास्त रुची ही क्रिकेटमध्ये होती.जडेजाला लहानपणी वडीलांंची प्रचंड भीती वाटायची. रवींद्रच्या आईचे २००५ मध्ये लता जडेजाचे अपघाती निधन झाले. त्यानंतर तो संपूर्ण हताश होऊन,क्रिकेट सोडण्याचा विचार केला मात्र त्याच्या मित्रांनी त्याला या नैराश्यातून बाहेर काढले.जडेजाने १७ एप्रिल २०१६ मध्ये रिवा सोलंकीशी लग्न केले. जून २०१७ मध्ये त्यांना ही मुलगी झाली आणि तिचे नाव ‘निध्याना’ ठेवले

- Advertisement -

७७ चेंडूत नाबाद ६० धावा …

सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये मलेशियामध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा जडेजा भाग होता. त्याने ८ फेब्रुवारी २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या सामन्यात ७७ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या. तथापि, त्याचे कसोटी पदार्पण जवळजवळ चार वर्षांनंतर, १३ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर येथे इंग्लंडविरुद्ध झाले.२०१२ च्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने जडेजाला $2 मिलियनमध्ये विकत घेतले होते. चेन्नई सुपर किंग्जला दोन हंगामांसाठी आयपीएलमधून बंदी घातल्यानंतर, २०१६ च्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावात त्यांना गुजरात लायन्सने ₹९.५ कोटींमध्ये विकत घेतले.

२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने जडेजाची निवड केली होती आणि त्यांच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. त्याने २००९ मध्ये आणखी चांगली कामगिरी केली. जडेजाला ‘रॉकस्टार’म्हणून सुद्धा ओळखले जाते.

- Advertisement -

जडेजाला क्रिकेट विश्वचषक 2019 साठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले. एप्रिल 2019 मध्ये, जडेजाची पत्नी रिवा सोलंकी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्याच महिन्यात तिचे वडील आणि बहीण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


हे ही वाचा – Ind vs Nz 2nd test : भारताचा वानखेडेवर मोठा विजय, १-० ने मालिका जिंकली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -