घर क्रीडा Heath Streak : झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूचं निधन; वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी...

Heath Streak : झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूचं निधन; वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

Heath Streak : झिम्बाब्वे क्रिकेट (Zimbabwe Cricket) संघाचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक (Heath Streak) मंगळवारी (22 ऑगस्ट) निधन झाले आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजारामुळे वयाच्या 49 व्या वर्षी हीथ स्ट्रीक यांनी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीकचा गोलंदाजी भागीदार असलेल्या हेन्नी ओलांगा याने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी देताना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेटपटू आर अश्विनसह अनेक क्रिकेटपटूंनीही महान गोलंदाजाची आठवण काढत दु:ख व्यक्त केलं आहे. (Heath Streak Zimbabwes legendary cricketer dies He took his last breath at the age of 49)

हेही वाचा – आशिया चषकासाठीच्या संघात कमीत कमी दोन फिरकीपटू हवे; गौतम गंभीरच्या वक्तव्याची होतेय चर्चा

- Advertisement -

माजी वेगवान गोलंदाज हेन्री ओलांगा यांनी ट्विटर X वर पोस्ट करत म्हटले की, दु:खाची बातमी आहे, हीथ स्ट्रीक दुसर्‍या जगात गेला आहे. आम्ही तयार केलेला महान अष्टपैलू खेळाडू. तुझ्यासोबत खेळणे खूप आनंददायक होते. जेव्हा माझ्या गोलंदाजीचा स्पेल संपेल, मी तुला येऊन भेटेन.” भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने ट्वीट करताना म्हटले की, “हीथ स्ट्रीक आता राहिला नाही. दुःखी! खरोखरच दुःखी आहे.”

- Advertisement -

हिथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याने 2000 ते 2004 दरम्यान संघाचे नेतृत्व केले होते. स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत 100 कसोटी विकेट घेणारा आणि कमजोर बॉलिंग युनिटला सांभाळून घेणारा तो आपल्या देशाचा एकमेव खेळाडू होता.

हीथ स्ट्रीकची गणना चांगल्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये नोंद केली जाते. कारण त्याने गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही आपली ताकद दाखवली होती. संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने अनेक सामने जिंकवून दिले होते. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीत हीथ स्ट्रीकने एकूण 1990 धावा आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2943 म्हणजेच जवळपास 3 हजार धावा केल्या आहेत. त्याने हरारे येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आणि एकमेव नाबाद कसोटी शतक (127) झळकावले आहे.

आयसीसीने लावली होती 8 वर्षांची बंदी

झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. जेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचारविरोधी उल्लंघनासाठी आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती. एप्रिल 2021 मध्ये त्याने 2016-2018 दरम्यान झिम्बाब्वेचे प्रशिक्षक, आयपीएल 2018 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स आणि आयपीएल 2018 दरम्यान काबुल झ्वानान यासह विविध फ्रँचायझींचे प्रशिक्षक म्हणून त्याच्या भूमिकेसाठी त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले पाच आरोप स्वीकारले होते.

- Advertisment -