‘मांकडिंग’वरून खेळाडूंमध्ये वाद; दीप्ती शर्मा खोटारडी, इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा आरोप

आयसीसीच्या मांकडींग या नियमावरून सध्या खेळाडूंमध्ये वाद निर्माण होत आहे. नुकताच झालेल्या भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील सामन्यात मांकडींगचा नियम पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिने इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला धावबाद केले.

आयसीसीच्या मांकडींग या नियमावरून सध्या खेळाडूंमध्ये वाद निर्माण होत आहे. नुकताच झालेल्या भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील सामन्यात मांकडींगचा नियम पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिने इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला धावबाद केले. चार्ली डीनला बाद करत भारताने मालिकेत विजय मिळवला. मात्र, मांकडींग नियमानुसार बाद केल्याने दीप्ती शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जात आहेत. अशातच इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट हिने दीप्ती शर्माना खोटारडी असे म्हटले. (Heather Knight India bowler Deepti Sharma Charlie Dean Mankad Saturday)

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला. परंतु, हा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी लागला आहे. तसेच, इंग्लंडच्या खेळाडूंकडून गोलंदाज दीप्ती शर्मावर टीका होताना दिसत आहे. त्यात इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट हिने भारतीय खेळाडूला खोटारडी असे म्हटले आहे. इंग्लंडच्या फलंदाजाला आम्ही ताकिद दिली होती आणि अम्पायरलाही याबाबत सांगितले होते, असा दावा दीप्तीने केला. मात्र, दीप्तीचा हा दावा इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटने खोडून काढला आणि भारतीय खेळाडू खोटे बोलत असल्याचे ती म्हणाली.

“इंग्लंडच्या फलंदाजाला आम्ही ताकिद दिली होती आणि अम्पायरलाही याबाबत सांगितले होते. मात्र, वारंवार ताकिद दिल्यानंतरही ती ऐकली नाही आणि त्यामुळे आम्ही तिला ठरवून बाद केले. आम्ही नियमानुसारच ती विकेट मिळवली. आम्ही अम्पायरलाही याबबात सांगितले होते, परंतु ती चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडत होती,” असे दीप्ती म्हणाली होती.

”भारतीय संघ विजयाचा हकदार आहे, परंतु त्यांच्याकडून तशी कोणतीच ताकिद दिली गेली नव्हती. त्यांना देण्याची गरज नाही, त्यामुळे ती विकेट कायदेशीर होत नाही. पण, जर त्यांना हा रन आऊट नियमानुसार केल्याचे वाटत असेल तर त्यावर आम्ही वॉर्निंग दिली होती, असं खोटं स्पष्टिकरण देण्याची गरज नाही”, असे हिदर नाइटने म्हटले.


हेही वाचा – ऋषभ पंत, दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोणाला मिळणार संधी; रोहित शर्माने दिले उत्तर