घरक्रीडायंदाची 'हिंद केसरी' महाराष्ट्राकडे; हरियाणाच्या सोमवीरचा पराभव करत पुण्याचा अभिजीत कटके विजयी

यंदाची ‘हिंद केसरी’ महाराष्ट्राकडे; हरियाणाच्या सोमवीरचा पराभव करत पुण्याचा अभिजीत कटके विजयी

Subscribe

यंदाचा 'हिंद केसरी' किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. पुण्यातील पैलवान अभिजीत कटके यांनी यंदा मैदान मारले असून, हरियाणाचा पैलवान सोमवीर याला पराभूत केले. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे.

यंदाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. पुण्यातील पैलवान अभिजीत कटके यांनी यंदा मैदान मारले असून, हरियाणाचा पैलवान सोमवीर याला पराभूत केले. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. यंदाची हिंद केसरी स्पर्धा हैद्राबाद येथे पार पडली होती. (Hind Kesari 2023 Winner Abhijit Katke Win Hind Kesari Kitab Beat Wrestler Somveer In Final )

हिंद केसरी स्पर्धा भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजली जाते. त्यामुळे यंदाची ‘हिद केसरी’ गदा पुण्याचा पैलवान अभिजीत कटके याने पटकावल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या ‘हिंद केसरी’ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.

- Advertisement -

याआधी, 2017 सालची महाराष्ट्र केसरीची गदा अभिजीत कटकेने पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. अभिजीत कटकेच्या या विजयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विट करत त्याला शुभच्छा दिल्या आहेत. त्यांनी “वा रे… पठ्ठ्या ! आपल्या वाघोलीचे सुपुत्र पैलवान अभिजित कटके हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! “अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘सगळे घाव झेलायला ताई आणि…’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -