घरक्रीडाICC T20I WORLD CUP 2021 : ओमानसाठी ऐतिहासिक क्षण

ICC T20I WORLD CUP 2021 : ओमानसाठी ऐतिहासिक क्षण

Subscribe

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी सज्ज

आयसीसीकडून टी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये होणार आहे. टी-२० वर्ल्डकपचा पहिला सामना १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. विषेश म्हणजे या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना २४ ऑक्टोबर रोजी परंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताच्या पाहिल्या सामन्याची उत्सकता आता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

टी -२० वर्ल्ड कपचे सामने यूएई, ओमान, अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. आठ देशांची क्वालिफाइंग मॅच २३ सप्टेंबरपासून सुरू होतील. क्वालिफाइंग मॅचच्या सामन्यात श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड सहभागी होणार आहेत. यावेळी सुपर १२ संघ २ गटांमध्ये विभागले गेले आहेत. सुपर-१२ सामन्यांपूर्वी क्वालिफाइंग मॅच खेळले जाणार आहेत.

- Advertisement -

ओमान क्रिकेट असोसिएशन ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकाचे सह-आयोजन करणार आहे हे केवळ ओमान क्रिकेटसाठीच नव्हे तर  हा देशासाठीही ऐतिहासिक क्षण असेल असे ओमान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज खिमजी म्हणाले. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाईल. ओमानसाठी ही सुवर्णसंधी आहे, जगाला हे दर्शवण्याची गरज आहे की तो पर्यटनाच्या दृष्टीने किती श्रीमंत आहे. लोकांना ओमानबद्दल जास्त माहिती नाही आणि या स्पर्धेद्वारे ओमान जगासमोर येईल.

ओमान क्रिकेट असोसिएशन ३००० प्रेक्षकांसाठी व्यवस्था करत आहे. त्यापैकी ५०० प्रेक्षक कॉर्पोरेट बॉक्समध्ये असतील. त्यासाठी सुंदर प्रेस बॉक्स आणि मीडिया सेंटर देखील बांधत आहेत. ही ओमानसाठी शिकण्याची संधी आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या आयोजनासाठी यजमान बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद खूप मोठ्या प्रमाणावर मदत करताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC 2021 RANKINGS : आयसीसी क्रमवारीत मोठे बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -