Rohit sharma : टी-२० मालिकेनंतर हिटमॅनला २५ दिवसांची विश्रांती, कमबॅक कधी ?

रोहित शर्मा आता थेट दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत दिसणार खेळताना आहे

टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अयशस्वी झालेल्या भारतीय संघाचा जोरदार कमबॅक झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरूध्च्या टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवून भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. हिटमॅन रोहितच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिली टी-२० मालिका जिंकली. लक्षणीय बाब म्हणजे  बीसीसीआयकडून कित्येक बड्या खेळांडूना विश्रांती देण्यात आली. रोहित शर्मा आता थेट दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी-२० विश्वचषकानंतर आहे. टी-२० मालिकेसाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना आराम देण्यात आला होता.

दरम्यान रोहित शर्माने टी-२० मालिकेत संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. आता २५ नोव्हेंबरपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरूध्द कसोटी मालिका खेळणार आहे, यामध्ये रोहित संघाचा हिस्सा नसणार आहे. विराट कोहलीचे दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनगारमन होणार आहे. अशातच पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. तर हिटमॅन रोहित आता थेट दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत दिसणार आहे. रोहित शर्मा जवळपास २५ दिवस विश्रांती घेणार आहे.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा डिसेंबरमध्ये होणार आहे. १७ डिसेंबरला पहिला कसोटी सामन्याची सुरूवात होईल. भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेसोबत ३ कसोटी, ३ एकदिवसीय, आणि ४ टी-२० सामने होणार आहेत. तसेच नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाची पहिली मोठी परिक्षा असणार आहे.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा

पहिला कसोटी सामना – १७-२१ डिसेंबर
दुसरा कसोटी सामना – २६-३० डिसेंबर
तिसरा कसोटी सामना – ३-७ जानेवारी, २०२२

पहिला एकदिवसीय सामना – ११ जानेवारी
दुसरा एकदिवसीय सामना – १४ जानेवारी
तिसरा एकदिवसीय सामना – १६ जानेवारी

पहिला टी-२० सामना – १९ जानेवारी
दुसरा टी-२० सामना – २१ जानेवारी
तिसरा टी-२० सामना – २३ जावनेवारी
चौथा टी-२० सामना – २६ जानेवारी


हे ही वाचा: BAN vs PAK : शोएब मलिकची बांगलादेश दौऱ्यातून माघार, कारण…