दक्षिण कोरियाने पटकावले हॉकी आशिया चषक २०२२ चे जेतेपद; पाचव्यांदा चषकावर कोरले नाव

हॉकी आशिया चषक २०२२ च्या (Hockey Asia Cup 2022) जेतेपदावर पुन्हा एकदा दक्षिण कोरियाने (South Coria) आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरिया संघाने २-१ अशा मलेशिया (Malashia) संघाचा पराभव केला.

हॉकी आशिया चषक २०२२ च्या (Hockey Asia Cup 2022) जेतेपदावर पुन्हा एकदा दक्षिण कोरियाने (South Coria) आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरिया संघाने २-१ अशा मलेशिया (Malashia) संघाचा पराभव केला. या विजयासह कोरियाने पाचव्यांदा हॉकी आशिया चषकाचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, या स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत मजल मारता आली नाही नसून, कांस्यपदक पदकावरच आपले समाधान मानावे लागले.

बुधवारी झालेल्या या स्पर्धेत भारताने जपानचा १-० असा पराभव करून आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीच्या समान्यात दक्षिण कोरियाकडून मांजे जंग याने १७ व्या मिनिटात, टेल ह्यांग यांने ५२ व्या मिनिटाला यांनी गोल केला. तसेच, मलेशियासाठी सय्यद चोलनने २५ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

दरम्यान, दक्षिण कोरिया आणि भारत (India) यांच्यात झालेल्या सामन्यात आठव्या मिनिटाला नीलम संजीपने भारतासाठी पहिला गोल केला होता. सामना अटीतटीचा सुरू असताना कोरियानं दोन गोल केले. त्यामुळे भारतानेही आक्रमक खेळी केली आणि सामन्याच्या २० व्या मिनिटाला मनिंदर सिंहने गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. काही वेळानी सेशे गौडाने या हॉकीपटूने भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, कोरियाकडून किमीने सामन्याच्या २७ व्या मिनिटाला गोल करत सामना अनिर्णित ठेवला.

तिसर्‍या क्वार्टरमध्ये मारिसवरन शक्तीवेलनं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जंग मांजेनं पुन्हा गोल करून बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही.


हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी अमेरिका संघ सज्ज; ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश