घरक्रीडाहॉकी वर्ल्ड कपच्या अॅंथम साँगचे टीजर रिलीज

हॉकी वर्ल्ड कपच्या अॅंथम साँगचे टीजर रिलीज

Subscribe

ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये २८ नोव्हेंबरपासून पुरुष हॉकी विश्व कप २०१८ ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बनवण्यात आलेल्या खास अॅंथन साँगचे टीजर रिलीज करण्यात आले.

ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये २८ नोव्हेंबरपासून पुरुष हॉकी विश्व कप २०१८ ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बनवण्यात आलेल्या खास अॅंथन साँगचे टीजर रिलीज करण्यात आले. संगीतकार ए. आर. रेहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून यामध्ये बॉलीवूडचा किंग शाहरुह खानदेखील दिसत आहे. साधारण ४६ सेकंदाचा हा व्हिडिओ असून यामध्ये ओडिसाच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. त्याशिवाय भारतीय हॉकी खेळाडूदेखील गाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ऑस्कर विनर ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी हॉकी वर्ल्ड कप २०१८ चे अॅंथम साँग जय हिंद इंडिया चा प्रोमो ज्यात शाहरुख खान आणि इतर संगीतकारदेखील आहेत, ज्यांनी याला बनवण्यासाठी सहकार्य केले आहे.

- Advertisement -

जय हिंद… जय इंडिया साँग 

शाहरुख खान हे मेन्स हॉकी वर्ल्ड कप २०१८ साठी प्रचार करत आहेत. त्यांनी हॉकी या खेळावर आधारीत चक दे इंडिया हा चित्रपट केला हेता. ए. आर. रेहमानच्या या अॅंथम साँगचे शब्द जय हिंद हिंद… जय इंडिया असे आहेत. हे वर्ल्ड कप भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे. ए. आर. रेहमान त्याच्या ओपनिंग सेरेमनीमध्येही सहभागी होणार आहेत. तसेच ते कटक येथील वर्ल्ड कप सेलिब्रेशनच्या इव्हेंटलाही परफॉर्म करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -