Hockey World Cup 2023 : भारताचे सामने कधी आणि कुठे होणार; पाहा वेळापत्रक

क्रीडा विश्वातील नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली आहे. आयसीसी विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मायदेशात सामने सुरू आहेत. अशातच आता, हॉकी विश्वचषक होणार आहे.

क्रीडा विश्वातील नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली आहे. आयसीसी विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मायदेशात सामने सुरू आहेत. अशातच आता, हॉकी विश्वचषक होणार आहे. 13 जानेवारी 2023 रोजी विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे तर, अंतिम सामना 29 जानेवारी रोजी होणार आहे. सर्व 16 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. (hockey world cup 2023 full schedule timing venue here everything know in marathi)

हॉकी विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताला मिळाले असून, सर्व सामने राउरकेला-भुवनेश्वर, ओडिशा येथे होणार आहेत. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी स्पोर्ट्स व्हिलेजचेही उद्घाटन केले आहे आणि संघ हळूहळू ओडिशात पोहोचत आहेत. हॉकी विश्वचषक २०२३ मध्ये एकूण ४४ सामने खेळवले जाणार आहेत.

चार पूलमध्ये संघांचे विभाजन

 • पूल अ – ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका
 • पूल ब – बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपान
 • पूल क – नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली
 • पूल ड – भारत, इंग्लंड, स्पेन आणि वेल्स

भारतीय संघाचे सामने कधी होणार

 • भारत विरुद्ध स्पेन – 13 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
 • भारत विरुद्ध इंग्लंड – 15 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
 • भारत विरुद्ध वेल्स – 19 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता

हॉकी विश्वचषक पूर्ण वेळापत्रक

13 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 1 – अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका
 • दुपारी 3 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स
 • संध्याकाळी ५ – इंग्लंड विरुद्ध वेल्स
 • संध्याकाळी ७ – भारत विरुद्ध स्पेन

14 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 1 – न्यूझीलंड विरुद्ध चिली
 • दुपारी 3 – नेदरलँड विरुद्ध मलेशिया
 • संध्याकाळी ५ – बेल्जियम विरुद्ध कोरिया
 • संध्याकाळी ७ – जर्मनी विरुद्ध जपान

15 जानेवारीला होणारे सामने

 • संध्याकाळी ५ – स्पेन विरुद्ध वेल्स
 • संध्याकाळी ७ – इंग्लंड विरुद्ध भारत

16 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 1 – मलेशिया विरुद्ध चिली
 • दुपारी 3 – न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड
 • संध्याकाळी ५ – फ्रान्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका
 • संध्याकाळी ७ – अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया

17 जानेवारीला होणारे सामने

 • संध्याकाळी ५ – कोरिया विरुद्ध जपान
 • संध्याकाळी ७ – जर्मनी विरुद्ध बेल्जियम

19 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 1 – मलेशिया विरुद्ध न्यूझीलंड
 • दुपारी 3 – नेदरलँड विरुद्ध चिली
 • संध्याकाळी ५ – स्पेन विरुद्ध इंग्लंड
 • संध्याकाळी ७ – भारत विरुद्ध वेल्स

20 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 1 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
 • दुपारी 3 – फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना
 • संध्याकाळी ५ – बेल्जियम विरुद्ध जपान
 • संध्याकाळी ७ – कोरिया विरुद्ध जर्मनी

24 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 4.30 – पहिली उपांत्यपूर्व फेरी
 • 7.00 PM – दुसरी उपांत्यपूर्व फेरी

25 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 4.30 – तिसरी उपांत्यपूर्व फेरी
 • 7.00 PM – चौथी उपांत्यपूर्व फेरी

27 जानेवारीला होणारे सामने

 • दुपारी 4.30 – पहिली उपांत्य फेरी
 • संध्याकाळी 7.00 – दुसरी उपांत्य फेरी

29 जानेवारी रोजी होणारे सामने

 • दुपारी 4.30 – कांस्यपदक सामना
 • संध्याकाळी 7.00 – सुवर्णपदक सामना

हेही वाचा – IND vs SL: वनडे मालिकेपूर्वी ‘या’ सरकारची मोठी घोषणा, क्रिकेटप्रेमींना दिलं अनोखं गिफ्ट