Hockey World Cup 2023: भारत वि. स्पेन यांच्यात रंगणार पहिला सामना

भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. आज चार रोमांचक सामने खेळवले जाणार आहेत. आज भारत आणि स्पेन यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. आज चार रोमांचक सामने खेळवले जाणार आहेत. आज भारत आणि स्पेन यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना ओडिशातील राउरकेला स्टेडियमवर होणार आहे. (hockey world cup 2023 indian hockey team will take on spain in the 1st match today)

भारतात खेळल्या जाणाऱ्या हॉकी विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. तसेच, हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात स्पेनचा सामना करण्यासाठी संघ सज्ज आहे. 13 ते 29 जानेवारी दरम्यान ओडिशामध्ये या स्पर्धेचे सामने होणार आहेत. यात एकूण 16 संघ सहभागी झाले असून, 4 गटांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांना क्रॉस ओव्हरविरुद्ध खेळावे लागेल.

भारत आणि स्पेन यांच्यातील सामना आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून होणार आहे. 1948 पासून या दोघांमध्ये एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघ 13 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तर स्पेनने 11 सामने जिंकले आहेत. सहा सामने अनिर्णित राहिले. 2020 च्या ऑलिम्पिक खेळांबद्दल बोलायचे तर, भारताने स्पेनविरुद्ध 3-0 असा मोठा विजय नोंदवला. बेल्जियम गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरणार आहे.

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले की, आम्हाला स्पेनच्या कमी अनुभवी खेळाडूंची चिंता नाही. स्पेनच्या बहुतेक खेळाडूंनी 100 पेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, तर भारताकडे 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने असलेले अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रीड म्हणाला की, अनुभवी खेळाडू असल्याने तुम्ही चमकदार कामगिरी कराल हे आवश्यक नाही.

दरम्यान, भारतासह अर्जेंटिना, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससह इतर संघही आज अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. भारतीय संघ हॉकी विश्वचषकात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशा परिस्थितीत संघाला स्पर्धेत उतरण्यापूर्वी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील लोक आपापल्या शैलीत हरमनप्रीत ब्रिगेडला शुभेच्छा देत आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – IND VS NZ : भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी होणार पहिला सामना