घरक्रीडाHong Kong Open : श्रीकांत, समीर वर्मा पराभूत 

Hong Kong Open : श्रीकांत, समीर वर्मा पराभूत 

Subscribe

भारताचे बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांचा हॉंगकॉंग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. श्रीकांतचा जपानच्या केंटा निशिमोटोने तर समीरचा हाँगकाँगच्या ली चेऊक यीऊने पराभव केला.

श्रीकांत सरळ सेटमध्ये पराभूत 

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा जपानच्या केंटा निशिमोटोने १७-२१, १३-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटची निशिमोटोने चांगली सुरुवात केली. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११-७ अशी आघाडी होती. तर पुढेही त्याने आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा सेट २१-१७ असा जिंकला. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला निशिमोटोने अधिकच आक्रमक खेळ करत मध्यंतरापर्यंत ११-३ अशी मोठी आघाडी मिळवली. तर पुढेही त्याने आक्रमण सुरु ठेवत हा सेट २१-१३ असा जिंकला. त्यामुळे श्रीकांतचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

वर्मा चांगला लढा देऊनही पराभूत 

समीर वर्मालाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा हाँगकाँगच्या ली चेऊक यीऊने २१-१५, १९-२१, २१-११ असा पराभव केला. या सामन्याचा पहिला सेट गमावल्यानंतर समीरने चांगले पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला. पण तिसऱ्या सेटमध्ये त्याला चांगला खेळ करण्यात अपयश आल्याने त्याने हा सेट २१-११ असा गमावत हा सामनाही गमावला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -