घरक्रीडाHong Kong Open : पारुपल्ली कश्यपचा मुख्य फेरीत प्रवेश

Hong Kong Open : पारुपल्ली कश्यपचा मुख्य फेरीत प्रवेश

Subscribe

पारुपल्ली कश्यपने हॉंगकॉंग ओपनला विजयी सलामी दिली आहे.

भारताचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने हॉंगकॉंग ओपनला विजयी सलामी दिली आहे. त्याने हॉंगकॉंग ओपनच्या पात्रता फेरीतील सामना जिंकला. त्यामुळे त्याने या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत कश्यपने चिनी ताइपेच्या सू जेन हाओचा २१-७, १२-२१, २१-१८ असा पराभव केला.

असा झाला सामना

या सामन्यातील पहिला सेट कश्यपने २१-७ असा मोठ्या फरकाने जिंकला. पण हाओने पुनरागमन करत दुसरा सेट २१-१२ असा जिंकला. तर चुरशीचा झालेला तिसरा सेट कश्यपने २१-१८ असा अवघ्या ३ गुणांनी जिंकला. त्यामुळे कश्यपने हा सामना जिंकत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश प्रवेश केला आहे. या फेरीत त्याच्या सामना इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटिंग याच्याशी होणार आहे.

मिश्र दुहेरीत विजयी सुरुवात

मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनेही विजयी सुरुवात केली. त्यांनी चिनी ताइपेच्या वांग ची-लीन आणि ली चिआ सिन या जोडीला २१-१६, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -