Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : बदललेल्या नावासोबत पंजाबची कामगिरीही बदलेल अशी आशा - राहुल

IPL 2021 : बदललेल्या नावासोबत पंजाबची कामगिरीही बदलेल अशी आशा – राहुल

पंजाबला मागील वर्षी १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले होते.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून यंदाच्या मोसमाआधी पंजाब संघाने आपले नाव, लोगो आणि जर्सीमध्ये बदल केला आहे. या संघाचे मागील वर्षीपर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब असे नाव होते, पण आता हा संघ पंजाब किंग्स नावाने ओळखला जाईल. नावासोबतच पंजाबच्या कामगिरीतही बदल होईल अशी या संघाचा कर्णधार लोकेश राहुलला आशा आहे. पंजाबला मागील वर्षी १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले होते. यंदा मात्र पंजाबचा संघ दमदार कामगिरी करेल असा राहुलला विश्वास आहे.

सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश

मागील वर्षी आम्ही चांगला खेळ केला होता. मात्र, आम्ही थोडे दुर्दैवी ठरलो होतो. काही सामने आम्हाला जिंकण्याची संधी होती, पण मोक्याच्या क्षणी आम्ही सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही. यंदा मात्र आमच्या नावात आणि जर्सीत बदल झाला असून कामगिरीतही बदल होईल अशी आशा आहे. आमचा संघ यावर्षी दमदार कामगिरी करेल असे मला वाटते, असे राहुल म्हणाला.

चांगले वेगवान गोलंदाज संघात

- Advertisement -

यंदा मी रायली मेरेडीच कशी कामगिरी करतो हे पाहण्यास उत्सुक आहे. मी काही सामन्यांत त्याची गोलंदाजी पाहिली असून त्याच्या गोलंदाजीला खूप वेग आहे. वेगाने मारा करू शकेल असा गोलंदाज मागील काही मोसमांमध्ये आमच्या संघात नव्हता. यंदा मात्र आम्ही चांगले वेगवान गोलंदाजी संघात घेतले आहेत, असे राहुल म्हणाला. यंदाच्या खेळाडू लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रायली मेरेडीचला पंजाबने ८ कोटी रुपयांत खरेदी केले.

- Advertisement -