घरक्रीडासूर्यकुमार कर्णधार कसा? क्रिकेट चाहते संतापले; म्हणाले, 2 खेळाडूंवर अन्याय

सूर्यकुमार कर्णधार कसा? क्रिकेट चाहते संतापले; म्हणाले, 2 खेळाडूंवर अन्याय

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा होताच आणि सूर्यकुमार कर्णधार बनल्याची माहिती येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. संजू स‌ॅमसनचीही या संघात निवड न झाल्यामुळे चाहते संतापलेले दिसत होते.

मुंबई: टीम इंडियाचं वनडे वर्ल्ड कप अभियान समाप्त झालं आहे. टीमची नजर आता 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या T20 सिरीजवर आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच T20 सामन्यांची मालिका होणार आहे. या सिरीजसाठी सोमवारी टीमची घोषणा झाली. आता टीम सिलेक्शनवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत असून वाद सुरू झाला आहे. भारतीय फॅन्स अजित आगरकरच्या नेतृत्त्वाखालील सिनियर सिलेक्शन कमिटीवर नाराज दिसत आहेत. कमिटीने या मालिकेसाठी आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवलं आहे. त्यावरून फॅन्सच्या मनात राग आहे. सोशल मीडियावर फॅन्सने आपला संताप व्यक्त केला आहे. (How is Suryakumar captain Cricket fans were outraged Said unfair to 2 players Akshar Patel and Sanju Samson)

सूर्यकुमार यादव हा एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होता पण त्यात त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला अर्धशतकही करता आलेलं नाही. अंतिम फेरीत त्याला संघासाठी मोठी खेळी खेळण्याची संधी होती पण सूर्यकुमार त्यात अपयशी ठरला. यानंतरही निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. याचे एक कारण म्हणजे सूर्यकुमार हा टी-20 मधला सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र सूर्यकुमारला कर्णधार करण्यात आल्याने काही क्रिकेट चाहते मात्र संतापले आहेत.

- Advertisement -

SKY कर्णधार, या दोन खेळाडूंवर अन्याय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा होताच आणि सूर्यकुमार कर्णधार बनल्याची माहिती येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. संजू स‌ॅमसनचीही या संघात निवड न झाल्यामुळे चाहते संतापलेले दिसत होते. संजू सॅमसनची वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघात निवड झाली होती. यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावरही गेला होता पण यावेळी त्याची संघात निवड झाली नाही. यामुळे संजूचे चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत.

अक्षर पटेललाही या संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे त्याची वनडे विश्वचषक संघात निवड झाली नाही. सूर्यकुमारच्या जागी अक्षर पटेलला या संघाचा कर्णधार बनवायचं होतं. पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मात्र अक्षर असताना गायकवाडला ही जबाबदारी का दिली गेली याचा राग चाहत्यांना आहे आणि यामागीतल तर्क असा आहे की अक्षर हा या दोघांपेक्षा वरिष्ठ आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Amateur Olympia : आशियातील सर्वात मोठे बॉडीबिल्डिंग फेस्टिवल पडले पार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -