IPL 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास मी उत्सुक, न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान

आयपीएलच्या १६व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्यास दोनच दिवस बाकी आहेत. अशातच न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने हार्दिक पांड्याबाबत मोठं विधान केलं आहे. वर्ल्ड क्लास हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे केन विल्यमसन याने म्हटले आहे.

आयपीएलच्या १६व्या हंगामातील सलामीचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मागील ८ वर्षांपासून सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा भाग असलेला विल्यमसन प्रथमच हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार आहे.

मी अनेक वर्षांपासून हार्दिकच्या विरुद्ध खेळलो आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मी मागील वर्षी त्याच्याविरुद्ध खेळलो. एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्यासाठी मागील हंगाम अप्रतिम होता. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी खूप उत्साही आहे, असं केन विल्यमसन म्हणाला.

२०२३च्या हंगामापूर्वी हैदराबादच्या फ्रँचायझीने रिलीज केल्यानंतर गुजरातच्या फ्रँचायझीने केनला आयपीएलच्या मिनी लिलावात २ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.


हेही वाचा :Virat Kohli In Form : आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली ७व्या स्थानावर