Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा 'तू कोरोनालाही सिक्सर मारशील!' अक्रमने दिल्या सचिन तेंडुलकरला शुभेच्छा  

‘तू कोरोनालाही सिक्सर मारशील!’ अक्रमने दिल्या सचिन तेंडुलकरला शुभेच्छा  

लवकर बरा हो मास्टर, असे अक्रम त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

Related Story

- Advertisement -

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सचिनला सहा दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाला होती. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सचिनने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिल्यावर तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली. तसेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही त्याच्यासाठी खास संदेश पाठवला. ‘अगदी १६ वर्षांचा असताना तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा धैर्याने सामना केला होतास. आता तू कोरोनालाही षटकार मारशील याची मला खात्री आहे. लवकर बरा हो मास्टर! भारताच्या २०११ वर्ल्डकप विजयाला १० वर्षे पूर्ण झाली. याचा आनंद डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांसह साजरा केल्यास मला फोटो पाठव,’ असे अक्रम म्हणाला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल

सचिनला शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. काही दिवसांतच मला पुन्हा घरी परत जाता येईल अशी आशा आहे. सर्वांनी काळजी घ्या,’ असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. सचिनने मागील शनिवारी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्वतःच ट्विट करत सांगितले होते. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे.

- Advertisement -