घरक्रीडाIND vs AUS : मी विराट कोहलीची माफी मागितली - रहाणे  

IND vs AUS : मी विराट कोहलीची माफी मागितली – रहाणे  

Subscribe

कोहली पहिल्या कसोटीत धावचीत झाला होता.  

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची खेळी केली होती. मात्र, त्याच्यात आणि अजिंक्य रहाणेमध्ये ताळमेळची गडबड झाल्याने विराट धावचीत झाला होता. कोहली बाद झाला त्यावेळी भारताची ४ बाद १८८ अशी धावसंख्या होती. मात्र, भारताचा डाव २४४ धावांत आटोपला. त्यामुळे कोहली धावचीत होणे हा भारताच्या पहिल्या डावाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचे क्रिकेट समीक्षकांना वाटले होते. ‘माझ्या चुकीमुळे विराट बाद झाल्याने मी त्याची माफी मागितली होती,’ असे अजिंक्यने शुक्रवारी सांगितले.

‘पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर मी विराटकडे जाऊन त्याची माफी मागितली होती. तो धावचीत झाला त्यावेळी आम्ही दोघे चांगली फलंदाजी करत होतो. मात्र, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात आणि विराटला हे माहित आहे. त्यामुळे विराटने मला दोष वैगरे दिला नाही,’ असे रहाणे म्हणाला. आता दुसऱ्या कसोटीत कोहली खेळणार नसल्याने त्याच्या जागी अजिंक्य भारताचे नेतृत्व करणार आहे.

- Advertisement -

अजिंक्य कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करेल असा विश्वास कोहलीने व्यक्त केला होता. ‘अजिंक्यने दोन सराव सामन्यांत कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली. त्याने संयम राखून योग्य निर्णय घेतले. आमच्या संघाच्या जमेच्या बाजू त्याला माहित आहेत. त्यामुळे कर्णधार म्हणून मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे,’ असे विराट म्हणाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -