घरक्रीडा'मी निवृत्ती घेतलेली नाही'; ख्रिस गेलचे स्पष्टीकरण

‘मी निवृत्ती घेतलेली नाही’; ख्रिस गेलचे स्पष्टीकरण

Subscribe

ख्रिस गेलच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधान आले होते. मात्र आपल्याला अजून निवृत्ती घ्यायची नाही, असे स्पष्टीकरण ख्रिस गेलने दिले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे मालिका संपल्यानंतर ख्रिस गेल वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर यासंदर्भात मोठी चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर ख्रिस गेलला शुभेच्छा दिल्या जात होत्या. याशिवाय ख्रिस गेल हा नवा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला. मात्र, यावर आता स्वत: ख्रिस गेलने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. बुधवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा तिसरा वन डे सामना संपल्यानंतर ख्रिस गेलने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आपण निवृत्ती घेणार नसल्याचे गेल म्हणाला. त्यामुळे विंडीजच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्य दिनी विराटचे भारतीयांना गिफ्ट; चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी

- Advertisement -

गेलची जबरदस्त कामगिरी

ख्रिस गेलने बुधवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या विरोधात जबरदस्त कामगिरी केली. त्याने धडकेबाज खेळी खेळत अर्धशतक पटकावले. मात्र, भारताने हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर ख्रिस गेलने आपण निवृत्ती घेत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे ख्रिस गेलच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम लागलेला आहे. सोशल मीडियावर ख्रिस गेलच्या निवृत्तीबाबत चर्चा होणारी ही पहिलीच वेळ नाही. याअगोदरही भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा होती. मात्र, यावर धोनीने स्पष्टीकरण दिल्यावर या विषयाला पूर्णविराम मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -