घरक्रीडाइंग्लंडविरुद्ध नक्की कशी गोलंदाजी करावी हेच कळले नाही; फिरकीपटूची कबुली

इंग्लंडविरुद्ध नक्की कशी गोलंदाजी करावी हेच कळले नाही; फिरकीपटूची कबुली

Subscribe

त्याने दोन एकदिवसीय सामन्यांत मिळून १५२ धावा खर्ची केल्या आणि तो एकही विकेट घेऊ शकला नाही.

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली. भारताने या तिन्ही मालिका जिंकल्या. मात्र, भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला भारताच्या या यशात फारसे योगदान देता आले नाही. कुलदीपला मागील काही काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने ५ सामन्यांत केवळ १ विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात कुलदीपला केवळ एक एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. तर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने निराशाजनक खेळ केला. दोन एकदिवसीय सामन्यांत मिळून त्याने १५२ धावा खर्ची केल्या आणि तो एकही विकेट घेऊ शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आल्याचे कुलदीपने आता कबूल केले आहे.

सातत्याने संधी न मिळाल्याने नुकसान

गोलंदाज म्हणून तुम्ही जेव्हा सातत्याने सामने खेळत असता, तेव्हा कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे याचा तुम्हाला अंदाज असतो. मात्र, तुम्हाला जेव्हा खूप कालावधीनंतर सामना खेळण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्ही चेंडू कधी जास्त पुढे आणि कधी जास्त मागे टाकता. त्यामुळे फलंदाजांना तुमच्याविरुद्ध धावा करणे सोपे होते. मला बराच काळ सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना माझ्यासाठी महत्वाचा होता. त्या सामन्यात नक्की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे हे मला कळले नाही, असे कुलदीप एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

कामगिरीत सुधारणा झाली

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या षटकात १३ धावा दिल्यावर मी चांगले पुनरागमन केले. दुसऱ्या सामन्यात माझ्या कामगिरीत सुधारणा झाली. मात्र, पुण्यातील खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना अजिबातच मदत नव्हती. त्यामुळे सर्वच फिरकीपटूंनी धावा खर्ची केल्या, असेही कुलदीपने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -