घरक्रीडामाझे द्रविडसोबत भांडण झाले नाही!

माझे द्रविडसोबत भांडण झाले नाही!

Subscribe

श्रीसंतने केले स्पष्ट

भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतचे माझ्यासोबत आणि राहुल द्रविडसोबत भांडण झाले होते, असे राजस्थान रॉयल्स संघाचे माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. ही घटना २०१३ आयपीएलच्या वेळी घडली होती. त्यावेळी श्रीसंत राजस्थानच्या संघात होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी न मिळाल्याने तो प्रचंड चिडला. त्याने द्रविड आणि मला शिवीगाळही केली, असे अप्टन यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. मात्र, श्रीसंतने हे आरोप फेटाळून लावले.

मी राहुल द्रविडसारख्या व्यक्तीचा अनादर करू शकत नाही. तो सर्वोत्तम कर्णधार आहे. चेन्नईविरुद्ध मला खेळण्याची संधी न मिळाल्याने मी चिडलो होतो, हे खरे आहे. मी याचे कारणही विचारले. मात्र, मला उत्तर मिळाले नाही. मला चेन्नईविरुद्ध खेळायचे होते आणि जिंकायचे होते. त्या सामन्यासाठी माझी संघात निवड का झाली नाही, हे मला शेवटपर्यंत कळले नाही. डर्बनमध्ये झालेल्या सामन्यात मी धोनीला बाद केले होते. मात्र, असे असतानाही चेन्नईविरुद्धच्या पुढील सामन्यात मला खेळण्याची संधी मिळाली नाही. या गोष्टीचा मला राग आला. मी धोनी किंवा चेन्नई संघाचा विरोधक नाही. परंतु, मला त्यांच्या जर्सीचा रंग आवडत नाही. त्यांच्या पिवळ्या जर्सीमुळे मला ऑस्ट्रेलियन संघाची आठवण होते, असे श्रीसंत म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -