घरक्रीडामी कोण आहे हे जगाला सांगायची गरज नाही ! - विराट कोहली

मी कोण आहे हे जगाला सांगायची गरज नाही ! – विराट कोहली

Subscribe

कोण माझ्याविषयी काय विचार करतो यावर माझे नियंत्रण नाही, असे विराट कोहली म्हणाला.

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बरीच टीका झाली आहे. मात्र मी कोण आहे, मी काय करतो हे मला जगाला सांगायची गरज नाही अशा शब्दांत विराटने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

माझे पूर्ण हे लक्ष सामन्यावर

‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पूर्वसंध्येला विराट म्हणाला, “मी कोण आहे, मी काय करतो, मी कसा विचार करतो हे मला जगाला सांगायची गरज नाही. टीका ही होतच असते. कोण माझ्याविषयी काय विचार करतो यावर माझे नियंत्रण नाही. त्यामुळे मी या टीकेवर फार लक्ष देत नाही. माझे पूर्ण हे लक्ष हे सामन्यावर आहे. खरे सांगायचे तर लोकांनी माझ्याविषयी काय लिहिले आहे हे मला माहितही नाही. प्रत्येकाची काही मते असतात आणि मला त्याचा आदर आहे. पण मी या सगळ्याचा विचार करत नाही.”

पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

तसेच पेनबरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीबाबत विराट म्हणाला, “जे झाले ते झाले. जेव्हा दोन संघ सामना जिंकण्याच्या जिद्दीने खेळत असतात तेव्हा अशा गोष्टी होऊ शकतात. मात्र आता जे झाले ते विसरून पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -