Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणे भाग पडले; प्रसाद...

निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणे भाग पडले; प्रसाद यांचे वक्तव्य  

निवड समितीचा अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने काही अवघड निर्णय घ्यावे लागतात.

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष असणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून मलासुद्धा काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणायचा निर्णय घेणे भाग पडले, असे विधान भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी केले. प्रसाद यांनी जवळपास चार वर्षे निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपला. परंतु, त्याआधी त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांनी २०१९ वर्ल्डकपसाठी अंबाती रायडूला वगळून विजय शंकरला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या वर्ल्डकपनंतर त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाबाहेर ठेवले. भारतीय संघाच्या हितासाठी मी काही निर्णय घेतल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

भावनिक निर्णय घेऊन चालत नाही

निवड समितीचा अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. संघहितासाठी तुम्हाला महान क्रिकेटपटूंनाही संघाबाहेर करणे भाग पडते. महान क्रिकेटपटूला संघाबाहेर करताना त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू शोधणे, हे सर्वात मोठे आव्हान असते. निवड समितीमध्ये असताना तुम्ही भावनिक निर्णय घेऊन चालत नाही, असे प्रसाद म्हणाले.

आमच्या निर्णयांचा आता भारताला फायदा

- Advertisement -

तुम्हाला धोनी किंवा सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू पुन्हा मिळू शकत नाही. त्यांचे भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या कामगिरीविषयी कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही. परंतु, तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात, असे प्रसाद यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा फायदा आता भारतीय संघाला होत आहे. ऑस्ट्रेलियात भारताचे ७ प्रमुख खेळाडू संघाबाहेर गेल्यावर ७ युवा खेळाडूंनी त्यांची जागा घेत अप्रतिम कामगिरी केली.

- Advertisement -