घरक्रीडामला स्वतःची ओळख निर्माण करायचीये; धोनीसोबत तुलनेबाबत पंतचे विधान

मला स्वतःची ओळख निर्माण करायचीये; धोनीसोबत तुलनेबाबत पंतचे विधान

Subscribe

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने अप्रतिम खेळ केला.

लोक माझी महेंद्रसिंग धोनीसोबत तुलना करत असल्याचा आनंद आहे, असे विधान भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने केले. पंतची कायमच भारताचा महान यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार धोनीशी तुलना केली जाते. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्याआधीच भारतीय संघ धोनीला वगळून पंतला संधी देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पंतला या संधीचे सोने करण्यात वारंवार अपयश आले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम खेळ केला. त्याने या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा (२७४) केल्या. त्यामुळे पुन्हा त्याची धोनीसोबत तुलना होत आहे.

तुलना करणे फारसे पटत नाही

लोक माझी धोनीसोबत तुलना करतात आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. परंतु, माझी तुलना इतर खेळाडूंशी झाली नाही, तर मला जास्त आवडेल. भारतीय क्रिकेटमध्ये मला माझे स्वतःचे नाव कमवायचे आहे. मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. महान खेळाडू आणि युवा खेळाडू यांच्यात तुलना करणे मला फारसे पटत नाही, असे पंतने सांगितले.

- Advertisement -

मालिका जिंकल्याचा आनंद

पंतने तिसऱ्या कसोटीत ९७ धावांची आणि त्यानंतर ब्रिस्बन येथे झालेल्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी केली. पंतच्या या खेळीमुळे भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. आम्ही ऑस्ट्रेलियात ज्याप्रकारे खेळलो आणि मालिका जिंकली, त्याचा खूप आनंद आहे, असे पंत म्हणाला.


हेही वाचा – अजिंक्य रहाणेचे मुंबईत जंगी स्वागत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -