Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा आणखी दोन-तीन वर्षे निवृत्तीचा विचार नाही; 'या' वेगवान गोलंदाजाचे विधान

आणखी दोन-तीन वर्षे निवृत्तीचा विचार नाही; ‘या’ वेगवान गोलंदाजाचे विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली.

Related Story

- Advertisement -

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मागील काही काळात सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. उमेशला दुखापतींनीही सतावले आहे. मागील वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात उमेशच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांना मुकावे लागले. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, असे असले तरी तो आणखी किमान दोन-तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे.

शरीर आणखी दोन-तीन वर्षे साथ देईल

मी आता ३३ वर्षांचा आहे. माझे शरीर मला आणखी दोन-तीन वर्षे साथ देईल असे वाटते. त्यामुळे मी तोपर्यंत निवृत्तीचा विचार करणार नाही. आता काही युवा वेगवान गोलंदाज पुढे येत आहेत आणि येत राहतील. मात्र, मी पूर्णपणे फिट असून भारतीय संघाच्या यशात योगदान देण्यास सज्ज आहे. चार-पाच सामन्यांच्या मालिकेत तुमच्याकडे पाच-सहा वेगवान गोलंदाज असल्यास संघाचा खूप फायदा होतो. तुम्ही प्रत्येक गोलंदाजाला दोन सामने खेळण्याची संधी देऊ शकता आणि त्यानंतर त्यांना विश्रांती मिळू शकते, असे उमेश म्हणाला.

कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याचा विश्वास

- Advertisement -

उमेशने आतापर्यंत ४८ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, त्याला परदेशात जास्त सामने खेळायला मिळालेले नाहीत. याबाबत त्याने सांगितले, मला परदेशात फारसे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर मी तितकीशी गोलंदाजी केलेली नाही. मात्र, मी आता पुरेसे कसोटी सामने खेळले असून कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याचा मला विश्वास आहे.

- Advertisement -