घरक्रीडा"मी नेहमी CSK च्या संघात असेन पण...", निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने टाकला पडदा

“मी नेहमी CSK च्या संघात असेन पण…”, निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने टाकला पडदा

Subscribe

चेन्नई हा संघ अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. पण हे सगळं असलं तरी चर्चा मात्र होतेय, ती धोनीच्या निवृत्तीबाबत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्याने अद्यापही याबाबत काही स्पष्ट असे मत व्यक्त केलेले नाही.

महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात आत्तापर्यंत चेन्नईच्या संघाने 4 विजेतेपद पटकाविले आहे. तसेच तब्बल 9 वेळा या संघाने अंतिम सामन्यात मजल मारलेली आहे. पण काल मंगळवारी (ता. 23 मे) चेन्नईच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या प्लेऑफच्या सामन्यात धोनीच्या संघाने हार्दिक पांड्याच्या गुजराच टायटन्स संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात थेट प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे आता चेन्नई हा संघ अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. पण हे सगळं असलं तरी चर्चा मात्र होतेय, ती धोनीच्या निवृत्तीबाबत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्याने अद्यापही याबाबत काही स्पष्ट असे मत व्यक्त केलेले नाही. (Dhoni expressed his opinion about retirement)

हेही वाचा – UPSC 2022 : सोलापुरातील शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS; 493व्या रँकने उतीर्ण; वाचा सविस्तर

- Advertisement -

अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर धोनीला पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. हर्षा भोगले यांनी थेट नाही पण फिरवून फिरवून त्याला पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीबाबत बोलते केले. यावेळी मात्र त्याने याबाबत आपले स्पष्टचं मत व्यक्त केले आहे. हर्षा भोगले यांनी धोनीला या सामन्याबाबत आणि फायनलबाबत काही प्रश्न विचारले. आता 10व्यांदा फायनल खेळणार आहेस, तुझ्यासाठी हा फक्त एक सामना आहे का, असा प्रश्न विचारत भोगले यांनी धोनीला बोलते करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भोगले यांनी धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला. “तु पुन्हा या मैदानात खेळताना दिसणार आहे की नाही,” असा प्रश्न त्यांच्याकडून विचारण्यात आला होता.

मात्र हर्षा भोगले यांचा रोख हा धोनीच्या निवृत्तीकडे होता. धोनीनेही त्यांना सुरुवातीला, तुम्ही मला नेहमीच हा प्रश्न विचारता, असे म्हणत प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. पण भोगले हे आपल्या प्रश्नावर ठाम राहीले आणि त्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत आपले स्पष्टपणे मत व्यक्त केले.

- Advertisement -

धोनी यावेळी निवृत्तीबाबत बोलताना म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा अजूनही कालावधी आहे. त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आयपीएलचा छोटेखानी लिलाव डिसेंबरमध्ये आहे, त्यावेळी याबाबत निर्णय घेतला जाईल. पण काहीही झाले तरी मी नेहमी CSK च्या संघात असेन. पण संघातून खेळेन की त्यांच्यासाठी मदत करेन, हे सांगता येणार नाही. मी जानेवारीपासून घराबाहेर आहे, मार्चपासून सराव करतोय, त्यामुळे सध्याच्या घडीला घरी जाण्याची ओढ जास्त लागली आहे. चेन्नईच्या संघातून खेळणार की नाही, हे ठरवण्यासाठी अजून बराच वेळ आहे. सध्या तरी गुजरातमध्ये जाऊन फायनल खेळणे हे आमच्यासाठी महत्वाचे असेल. फायनल झाली की काही महिन्यांनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी हे सांगणे मला उचित वाटत नाही.”

त्यामुळे बाहेर कितीही चर्चा होत असली तरी, धोनीने मात्र त्याच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत अद्याप तरी विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे. तसेच, आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे, ते म्हणजे आयपीएलच्या फायनल राऊंडकडे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईसोबत नेमके कोण फायनलमध्ये येते आणि मग फायनलचा कप कोणाच्या हाती येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -