Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारतीय संघात 'कमबॅक' करायला आवडेल, पण हार्दिक पांड्याशी स्पर्धा नाही!

भारतीय संघात ‘कमबॅक’ करायला आवडेल, पण हार्दिक पांड्याशी स्पर्धा नाही!

शिवम दुबे यंदा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळेल. 

Related Story

- Advertisement -

मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेला २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याला फारशी छाप पाडता आली नाही. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १३ सामन्यांत केवळ १०५ धावा केल्या आणि तो अवघ्या पाच विकेट घेऊ शकला. त्यामुळे त्याने भारतीय संघातील स्थान गमावले. तसेच त्याला आयपीएलच्या मागील मोसमातही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुबेला पुन्हा करारबद्ध केले नाही. यंदा तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार असून या मोसमात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. तसेच भारतीय संघात त्याला पुनरागमन करायचे आहे. मात्र, माझी हार्दिक पांड्याशी स्पर्धा नाही, असे त्याने स्पष्ट केले.

कामगिरीत सुधारणा करणे महत्वाचे

प्रत्येक आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायला मला आवडेल. मात्र, सध्या मी केवळ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यापेक्षा स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करणे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, असे दुबे म्हणाला.

माझी स्वतःशी स्पर्धा

- Advertisement -

भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास माझी हार्दिक पांड्याशी स्पर्धा असल्याचे म्हटले जाते. मात्र, मला या गोष्टीची फार चिंता नाही. अष्टपैलू असलो तरी माझ्यात आणि हार्दिकमध्ये स्पर्धा नाही. मला स्वतःच्या खेळात सुधारणा करायची आहे. त्यामुळे माझी स्पर्धा केवळ स्वतःशी आहे. मी हार्दिकबाबत किंवा माझ्या भविष्याबाबत फार विचार करत नाही, असेही दुबेने सांगितले.

- Advertisement -