Homeक्रीडाJasprit Bumrah : गोलंदाजी करताना बुमराहच्या हाताच्या स्थितीचे विश्लेषण गरजेचे; ऑस्ट्रेलियाची मागणी

Jasprit Bumrah : गोलंदाजी करताना बुमराहच्या हाताच्या स्थितीचे विश्लेषण गरजेचे; ऑस्ट्रेलियाची मागणी

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे अनुभवी क्रिकेट ब्रॉडकास्टर इयान मॉरिसने यांनी जसप्रीत बुमराह संशयास्पद गोलंदाजी करत असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : बॉर्डर गावसकर ट्रॉफीनिमित्त भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला असून तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना त्रास देत आहे. त्याने या मालिकेत 20 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ऑस्ट्रेलियाकडून निशाणा साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे अनुभवी क्रिकेट ब्रॉडकास्टर इयान मॉरिसने यांनी जसप्रीत बुमराह संशयास्पद गोलंदाजी करत असल्याचा आरोप केला आहे. (Ian Morris demands analysis of Jasprit Bumrah hand position while bowling)

इयान मॉरिस यांनी ट्वीट करताना म्हटले की, भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहच्या गोलंदाजी शैलीवर अद्याप कोणीही आक्षेप का घेतला नाही? राजकीयदृष्ट्या हे योग्य नाही का? तो चेंडू फेकत आहे असे मी म्हणत नाही, पण चेंडू फेकताना त्याच्या हाताच्या स्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. मॉरिस यांनी बुमराहच्या गोलंदाजींवर आक्षेप घेतल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर इयान मॉरिस यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले की, माझ्यावर हल्ला करू इच्छिणाऱ्यांनी मी जे लिहिले आहे, ते वाचण्याची तसदी घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. बुमराह चेडू फेकतो असे मी म्हणत नाही, पण त्याच्या गोलंदाजी शैलीचे विश्लेषण झाले पाहिजे, असा पुनरुच्चार इयान मॉरिसन यांनी केला.

ऑस्ट्रेलियात बुमराहच्या कृतीवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पहिल्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बुमराहवर चकिंगचा आरोप केला होता. मात्र बुमराहने भारतासाठी एकहाती सामना जिंकवून दिला होता. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेत जसप्रीत बुमराहने चमकदार कामगिरी केली आहे. 10.90 च्या सरासरीने 21 विकेट घेत बुमराह कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. पहिल्या तीन सामन्यांवर नजर टाकली तर बुमराहने या मालिकेत दोनदा पाच आणि एकदा चार विकेट्स घेतल्या आहेत.