घरICC WC 2023रोहित शर्मा विश्वचषकातील यशस्वी कर्णधार का आहे? गौतम गंभीरने सांगितलं कारण

रोहित शर्मा विश्वचषकातील यशस्वी कर्णधार का आहे? गौतम गंभीरने सांगितलं कारण

Subscribe

माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कर्णधार कौशल्याची प्रशंसा केली आणि म्हटले की एक चांगला कर्णधार त्याच्या सहकाऱ्यांना संरक्षण देतो आणि हा राईट आर्म बॅटर अनेक वर्षांपासून हे करत आहे.

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कर्णधार कौशल्याची प्रशंसा केली आणि म्हटले की एक चांगला कर्णधार त्याच्या सहकाऱ्यांना संरक्षण देतो आणि हा राईट आर्म बॅटर अनेक वर्षांपासून हे करत आहे. (ICC 2023 Why is Rohit Sharma a successful World Cup captain Gautam Gambhir told the reason)

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. याशिवाय 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धाही जिंकली होती.

- Advertisement -

रोहितने आतापर्यंत 2023 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत फलंदाज आणि कर्णधार म्हणून आपली छाप सोडली आहे. भारताने साखळी टप्प्यातील सर्व नऊ सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेटच्या एकूण सामन्यांबद्दल बोललो, तर दोन्ही देशांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 117 सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 59 तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. सात सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत राहिला.

गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “एक चांगला कर्णधार तुम्हाला सुरक्षा देतो, ज्यामुळे ड्रेसिंग रूम केवळ त्याच्यासाठीच नाही तर इतर खेळाडूंसाठीही सुरक्षित असते आणि रोहित शर्माने हे केले आहे.”

- Advertisement -

तो म्हणाला, “हेच कारण आहे की रोहितने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळेच जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचे विजयाचे आकडे उत्कृष्ट होते. आकडेवारी आणि ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर त्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने ड्रेसिंग रूम अतिशय आरामदायक बनवली आहे.”

पॉवरप्लेमध्ये रोहितची आक्रमक वृत्ती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंचला आवडते. तो म्हणाला, “रोहितने चमकदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये विरोधी संघावर दबाव आणणे खरोखर महत्वाचे आहे. ”

(हेही वाचा: Mitchell Starc : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूची मोठी घोषणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -