IND vs NZ Test Series : अक्षर-पटेल आणि रवींद्र-जडेजा यांच्यापासून बनलेले चार भारत-न्यूझीलंड खेळाडू; ICC ने केला फोटो शेयर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने एक शानदार फोटो शेयर केला आहे.त्या फोटोत या कसोटी सामन्यातील चारही हिरो सोबत दिसत आहेत

भारत आणि न्यूझीलंडमधील मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान भारताने ३७२ धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेवर १-० ने कब्जा केला. या मालिकेत काही अविस्मरणीय क्षण पहायला मिळाले. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलने एका डावात भारताचे १० बळी घेऊन नव्या विक्रमाला गवसणी घातली. दरम्यान रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी अनेक वेळा स्वबळावर बळी घेत सामन्याची स्थिती बदलली. मात्र कानपूर कसोटीत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने भारताला सामना जिंकू दिला नाही. भारतातर्फे रवींद्र जडेजानेही कानपूर कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली होती.

दरम्यान, मालिका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (ICC) एक शानदार फोटो शेयर केला आहे. त्या फोटोत या कसोटी सामन्यातील चारही हिरो सोबत दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, एजाज पटेल, रचिन रविंद्र आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू आहेत. त्यांना एका ओळीत उभे केले आहेत. यातून दोन्ही देशातील चांगली खेळभावना दिसत आहे.

लक्षणीय बाब म्हणजे या चारही खेळांडूच्या जर्सीवरून भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांची नावे तयार झाली आहेत. अक्षरच्या जर्सीवर ‘अक्षर’ लिहले आहे आणि त्याच्या बाजूला पटेलच्या जर्सीत ‘एजाज’ लिहले आहे. तर रचिनच्या जर्सीवर ‘रवींद्र’ लिहले आहे आणि बाजूला सर जडेजा जडेजाच्या जर्सीत उभा आहे. दरम्यान या चांगल्या फोटोला बीसीसीआयने (BCCI) देखील शेयर केले आहे. रचिन आणि जडेजा दोघांच्या जर्सीचा नंबर देखील समान आहे. दोघेही ८ नंबरची जर्सी वापरतात.

सोशल मीडियावरही या फोटोला खूप पसंती मिळत आहे. दुखापतीमुळे जडेजा दुसरी कसोटी खेळू शकला नाही. तर रचिनने कानपूरमध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याचे नाव रचिन राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. रचिनच्या आई-वडिलांना द्रविड आणि सचिन खूप आवडायचे.


हे ही वाचा: http://IND vs NZ Test Series : मयंक अग्रवालचे माजी क्रिकेटरकडून कौतुक; म्हणाला, ही सेहवागची…