घरक्रीडाICC best playing XI : आयसीसीची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूंना स्थान...

ICC best playing XI : आयसीसीची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूंना स्थान ?

Subscribe

आयसीसी वर्ल्ड कप २०२१ ऑस्ट्रेलियाच्या विजयासह अखेर या मालिकेची सांगता झाली. ऑस्ट्रेलियाने फायनलच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. या टूर्नामेंटची सांगता होताच आयसीसीने टी २० वर्ल्ड कपच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संघात भारतीय संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही. या प्लेइंग इलेव्हनमध्ये आयसीसीने १२ वा खेळाडूही निवडला आहे, तोदेखील पाकिस्तान संघातील आहे. आयसीसीने यंदाच्या प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार म्हणून बाबर आजमची निवड केली आहे. आयसीसीने यंदा टी २० वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या आधारावरच ही निवड केली आहे.

कोण आहे आयसीसी ‘प्लेइंग इलेव्हन’ मध्ये

आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये ओपनर म्हणून डेविड वॉर्नर आणि जॉस बटलरला स्थान मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमाकांवर बाबर आजमला स्थान मिळाले. बाबर आझम हा संघाचा कर्णधारही आहे. मधल्या फळीतील खेळाडूंमध्ये चरिथ असलंका आणि एडम मार्करमला जागा मिळाली. त्यानंतरच्या फलंदाजांमध्ये ऑलराउंडर मोइन अली आणि वानेंदु हसरंगाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. हे दोन्ही खेळाडून फलंदाजीही करतात. गोलंदाजांमध्ये स्पिनर म्हणून एडम जंपा, तर वेगवान गोलंदाजांमध्ये जोश हेजलवुड, ट्रेंट बोल्ट, एनरिच नात्जेचा समावेश करण्यात आला आहे. पण संपुर्ण प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. यंदाच्या मालिकेत एकाही भारतीय खेळाडूने आपल्या कामगिरीने प्रभाव पाडला नाही. यंदाच्या टी २० मालिकेत भारतीय संघाला सेमीफायनलही गाठणे शक्य झाले नव्हते.

- Advertisement -

आयसीसीने निवडलेली प्लेइंग इलेव्हन

डेविड वॉर्नर, जॉस बटलर (विकेटकीपर), बाबर आजम (कॅप्टन), चरिथ असलंका, एडम मार्करम, मोइन अली, वानेंदु हसरंगा, एडम जंपा, जोश हेजलवुड, ट्रेंट बोल्ट, एनरिच नार्त्जे, शाहीन अफरीदी (१२ वा खेळाडू)


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -