घरक्रीडा'त्या' डॉक्युमेंटरीतला मॅच फिक्सर अनिल मुनावर आहे तरी कोण?

‘त्या’ डॉक्युमेंटरीतला मॅच फिक्सर अनिल मुनावर आहे तरी कोण?

Subscribe

कतारमधील चॅनल अल-जझीराने यावर्षीच्या मे महिन्यात एक डॉक्युमेंटरी काढली होती. ज्यामध्ये अनिल मुनावर नामक व्यक्तीने तो सहा ते सात वर्षे मॅच फिक्सिंग करत असल्याचे म्हटले होते. त्याचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

यावर्षीच्या मे महिन्यात अल-जझीरा वाहिनीने एक डॉक्युमेंटरी काढली होती. ज्यात दाखवले होते की २०१७ मध्ये रांची येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना काही विशिष्ट षटकांत धिम्या गतीने खेळण्यासाठी पैसे देण्यात आले होते. तसेच याच व्हिडिओमध्ये संशयित मॅच फिक्सर अनिल मुनावर यालाही बऱ्याचदा दाखवण्यात आले होते.

अनील मुनावर याचे खेळाडूंबरोबर फोटो

२०१२ साली श्रीलंकेत झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनिल मुनावर याचे तेव्हाचा वेस्ट इंडियन कर्णधार डॅरेन सॅमी याच्यासोबत तसेच इंग्लंडच्या दोन खेळाडूंसोबतचे छायाचित्र अल-जझीराच्या डॉक्युमेंटरीत दाखवले गेले होते. मुनावर याचा डी-कंपनीशी संबंध असल्याचेही सांगितले जात आहे.

ICCकडून मदतीचे आवाहन 

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे महाव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल यांनी या प्रकरणाबाबत म्हटले, “आम्ही अल-जझीराच्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलेल्या व्यक्तींशी संपर्क केला आहे. त्यापैकी काहींचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. या डॉक्युमेंटरीत अनिल मुनावर केंद्रस्थानी आहे. त्याच्याविषयी आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याची खरी ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे जर कोणत्याही व्यक्तीला मुनावरविषयी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.”

फिक्सर्सचा शोध घेण्यासाठी अल-जझीराकडून असहकार

आयसीसीच्या म्हणण्यानुसार या मॅच फिक्सर आणि सट्टेबाजांचा शोध घेण्यासाठी अल-जझीरा चॅनल फारशी मदत करत नाहीये. तसेच काही दिवसांत अल-जझीराची आणखी एक डॉक्युमेंटरी येणार आहे ज्यात जुनी मॅच फिक्सिंगची प्रकरणे दाखवण्यात येणार आहेत. याविषयी मार्शल म्हणाले, “पहिल्या डॉक्युमेंटरीप्रमाणेच दुसऱ्या डॉक्युमेंटरी संदर्भात आम्ही अल-जझीराला सहकार्यासाठी विचारत राहू. जर त्यांच्याकडून मदत मिळाली तर आमचे काम सोपे होईल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -