Homeक्रीडाICC Champions Trophy 2025 : अखेर हाइब्रिड मॉडलला मान्यता; भारताचे सामने कुठे?...

ICC Champions Trophy 2025 : अखेर हाइब्रिड मॉडलला मान्यता; भारताचे सामने कुठे? जाणून घ्या…

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मुळे वाद सुरू होता. मात्र आता आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मुळे वाद सुरू होता. एकीकडे पीसीबी हे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्यावर आग्रही होता, दुसरीकडे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अडचणीत वाढ झाली होती. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूवी पीसीबीने हायब्रिड मॉडेल स्वीकारणार नसल्याचेही आयसीसीला कळवले होते. मात्र आता आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली आहे. (ICC approves hybrid model for Champions Trophy 2025)

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देत त्याऐवजी ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान सोडून इतर ठिकाणी सामने खेळण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय तटस्थ होती. तर दुसरीकडे पाकिस्तानने गेल्या आठवड्यात आयसीसीच्या शेवटच्या बैठकीत बहिष्काराची धमकी मागे घेत हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवली होती. मात्र 2031 पर्यंत स्वतःसाठी समान व्यवस्था करण्याची मागणी केली होती. यानंतर आयसीसीने 2026 पर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली आहे. या कालावधीत, भारत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक आणि 2026 पुरुषांचा T20 विश्वचषक श्रीलंकेसोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – SMAT 2024 : दोन धावांनी शतक हुकले, पण रहाणेच्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई फायनलमध्ये 

समोर आलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात करार झाला आहे. भारतीय संघ आता आपले सामने दुबईत खेळणार आहे, तर इतर सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. याशिवाय 2026 टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध साखळी टप्प्यातील सामन्यासाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही, हा सामना कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यासाठी कोणतीही आर्थिक भरपाई मिळणार नाही. मात्र पीसीबीने 2027 नंतर आयसीसी महिला स्पर्धेचे यजमानपद मिळवले आहे, अशी माहिती एका क्रीडा वृत्तसंस्थेने दिली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कधी?

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान आणि दुबई येथे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यावर अंतिम फेरी खेळवण्यात येईल. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धाही हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्यात आली होती. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, मात्र भारताते सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

हेही वाचा – Vinod Kambli : कपिल देव यांच्या ऑफरवर विनोद कांबळी म्हणाला…


Edited By Rohit Patil