Homeक्रीडाChampions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली तरी...; पाकिस्तान यजमानपद गमावण्याची...

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली तरी…; पाकिस्तान यजमानपद गमावण्याची शक्यता

Subscribe

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आता दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वच संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने ज्या मैदानावर होणार आहेत, त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आता दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वच संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने ज्या मैदानावर होणार आहेत, त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पाकिस्तातील स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (icc champions trophy 2025 icc may shift venue to dubai due to venue construction upgradation work is still underway in karachi lahore rawalpindi)

नेमकं कारण काय?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. पण पाकिस्तानला हे पद भुषवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी पाकिस्तान हे यजमान पद स्पर्धेच्या ऐनवेळी गमावण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर व कराची येथे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत. पण कराचीच्या नॅशनल स्टेडियम, लाहोरचा गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमची सध्याची परिस्थिती पाहता, तिथे सामने होतील की नाही ही शंका आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) 12 फेब्रुवारी पूर्वी नियोजीत स्टेडीयमचा ताबा आयसीसीकडे सोपवायचा आहे. परंतु, कराचीच्या नॅशनल स्टेडियम, लाहोरचा गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमचं काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे आयसीसी पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने दुबईत खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा समावेश चॅम्पियन्स ट्रॉफीत असल्याने भारताचे सामने हे पाकिस्तानात खेळवले जाणार नाहीत. त्यामुळे आयसीसीला स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेल मान्य केले आणि त्यानुसार भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवणार असल्याचे ठरले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये 10 सामने होतील, परंतु आता त्यांच्या होण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

पाकिस्तानप्रमाणे याआधी आयसीसीला अमेरिकेत पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही अशाप्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी संघ या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये दाखल होतील. पण, स्टेडियमची सध्याची स्थिती पाहता बॅक अप प्लान म्हणून दुबईचा विचार संपूर्ण स्पर्धेसाठी केला जाऊ शक्यता वर्तवली जात आहे.

लाहोर आणि कराची येथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. ड्रेसिंग रूम, हॉस्पिटॅलिटी बॉक्स अद्याप अंतिम टप्प्यात आलेले नाहीत. येथे कुंपण घालण्याचे काम, फ्लडलाइट्स आणि आसन व्यवस्थेचं कामही झालेलं नाही. तसेच,
स्टेडियम्स आयसीसीकडे सुपूर्द होण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. परिणामी संपूर्ण स्पर्धा यूएईमध्ये हलविण्याबाबत चर्चा होत आहे.


हेही वाचा – Bumrah : देशासाठी खेळणे थांबवा अन्…; ऑस्ट्रेलियाविरोधात पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.