घरक्रीडाकोरोनाबाधित खेळाडूंनाही खेळता येणार सामना; आयसीसीचा मोठा निर्णय

कोरोनाबाधित खेळाडूंनाही खेळता येणार सामना; आयसीसीचा मोठा निर्णय

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या खेळाडूला कोरोना झाल्यास विलगीकरण करण्यात येत होते. मात्र, आता या खेळाडूंना खेळता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या खेळाडूला कोरोना झाल्यास विलगीकरण करण्यात येत होते. मात्र, आता या खेळाडूंना खेळता येणार आहे. आयसीसीने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली असून, सुरूवातीपासूनच या स्पर्धेतील सामन्यातील चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. (ICC covid 19 positive players allowed to play world cup t20 world cup 2022)

एकिकडे आयसीसीकडून कोरोना बाधित खेळाडूंना विश्वचषक खेळण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, पहिल्याच सामन्यात अतितटीची लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नामिबियाच्या नवख्या संघाने 55 धावांनी श्रीलंकेला पराभूत केले. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या आशिया चषकाचे जेतेपद श्रीलंकाने पटकावले होते.

बीसीसीआयने जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला भारतीय संघात संधी दिली आहे. शमी त्याच्या किलर बॉलिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – टी-20 विश्वचषक : नामिबियाचा 55 धावांनी श्रीलंकेवर दमदार विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -